1 October 2023 3:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी स्टॉक तेजीत वाढतोय, मोठ्या कॉन्ट्रॅक्टचा पाऊस, आता परताव्याचा पाऊस? Mufin Green Share Price | कमाल झाली! मुफिन ग्रीन फायनान्स शेअरने एका दिवसात 9.99% परतावा दिला, लवकरच मल्टिबॅगर परतावा? Gujarat Alkalies Share Price | मालामाल मल्टिबॅगर शेअर! गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स शेअरने अल्पावधीत दिला 300% परतावा Stocks To Buy | टॉप 5 शेअर्स गुंतवणुकीसाठी सेव्ह करून ठेवा, अल्पावधीत हे शेअर्स 36 टक्के पर्यंत परतावा देतील Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 01 ऑक्टोबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया शेअरने तब्बल 3970 टक्के परतावा दिला, ऑर्डर्सबुक मजबूत, फायदा घ्या Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीला मिळाला सर्वात मोठा कॉन्ट्रॅक्ट, शेअर्स तेजीच्या संकेताने खरेदी वाढली
x

महिला अत्याचार | भाजप आमदाराकडून महिला अधिकाऱ्याला अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ | भाजपचा दुतोंडी चेहरा उघड

BJP Maharashtra

पुणे, २६ सप्टेंबर | पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या आमदाराची एका महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे. अतिशय अर्वाच्य भाषेत भारतीय जनता पक्षाचे आमदार महिला अधिकाऱ्याला बोलत असल्याचं ऑडिओ क्लिपमधून ऐकायला मिळतंय. ही ऑडिओ क्लिप राज्याच्या माजी सामाजिक न्यायमंत्र्यांच्या आमदार भावाची असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे आणि त्यामुळे समाज माध्यमांवर देखील तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Pune BJP MLA insulting Pune municipal corporation women officer offensive language phone audio call :

ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?
पुणे महापालिकेतील कामाच्या लॉकिंग बिलासंदर्भात आमदारांनी महिला अधिकाऱ्याला फोन केला. बिलं काढता की नाही, काय करता ते सांगा? नाहीतर तुमच्याकडे बघून घेतो, असं म्हणत महिला अधिकाऱ्याला आमदारांनी धमकाविण्याचा प्रयत्न करत अतिशय गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली.

किती वेळा त्याने तुमच्याकडे यायचं, काम होणार आहे की नाही, नसेल तर तसं सांगा, मी बघतो मग काय करायचं?”, असं आमदार तावातावाने अधिकाऱ्याला म्हणत आहे. त्यावर महिला अधिकारी तुम्ही आमच्या साहेबांना फोन करा, असं सांगतात. त्यावर मी काय तुमचा नोकर आहे का?, तुम्ही तुमच्या साहेबाला फोन करा, आणि मला परत 10 मिनिटांत फोन करा, असं आमदार म्हणतात. पुण्यातील अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर ही ऑडिओ क्लिप अतिशय वेगाने व्हायरल होतीय. अनेक जण ही ऑडिओ क्लिप ऐकून संताप व्यक्त करतायत. मात्र जरी ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. टीव्ही 9’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

भाजप आमदार सुनील कांबळे:
ड्रेनेज विभागातील काम करण्यासाठी पुणे महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्यास कार्यकर्त्याच्या फोनवरून आमदार सुनील कांबळे यांनी फोन लावला होता. त्यावर संबधीत महिला अधिकाऱ्यानी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल, असे म्हटले होते. त्यावर कांबळे यांनी संबधित महिला अधिकाऱ्यास घाणरडया भाषेत शिवीगाळ केली. महिला अधिकारी आणि आमदार सुनील कांबळे यांच्यात जवळपास २ मिनिटाचे संभाषण झाले. त्यानंतर आता त्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाला असून त्यावर आमदार सुनील कांबळे यांनी ती क्लिप जुनी असल्याची प्रतिक्रिया दिली.

हा ऑडिओ जुना असल्याचे सांगत आमदार सुनील कांबळे यांनी अन्य कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. मात्र ही ऑडिओ क्लिप जुनी असल्याचे म्हणत सुनील कांबळे यांनी एक प्रकारे कबुलीच दिली आहे.

एकंदरितच ही ऑडिओ अतिशय गलिच्छ आणि अर्वाच्य भाषेतली आहे. एका लोकप्रतिनिधीला ही भाषा नक्कीच शोभणारी नाही. महिला अधिकाऱ्याशी अशा प्रकारे बोलणं निश्चित शोभणार नाही. महिलांचा सन्मान करा असं सांगणारे भाजपा नेते आता संबंधित आमदारावर कारवाई करणार का?, हे पाहणे महत्त्वाचं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Pune BJP MLA’s viral audio clip of insulting Pune municipal corporation women officer in offensive language.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x