30 May 2023 3:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Calculator | PPF कॅल्क्युलेटर सांगेल 1000 गुंतवून 18 लाख परतावा कसा मिळवायचा, पैसा वाढवणारी माहिती  Loan Recovery Rules | आता तुमचे बॅंकेचे EMI थकले तरी डोन्टवरी, कर्जदाराला आरबीआयने दिलेले महत्वाचे अधिकार लक्षात ठेवा Investment Tips | या सरकारी योजनेत दररोज 45 रुपये गुंतवल्यास 25 लाख रुपये परतावा मिळेल, अधिक जाणून घ्या Multiple Bank Accounts | बँकेत एकापेक्षा जास्त अकाउंट्स असतील तर आधी ही खबरदारी घ्या, अन्यथा... Plan 475 | ममता-नितीश यांचा प्लॅन 475 काय आहे? 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने 52 जागा जिंकल्या होत्या तर 209 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होते Triveni Engineering Share Price | मागील 5 दिवसात त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स तेजीत, नेमके कारण काय? Sterling Tools Share Price | मल्टीबॅगर स्टर्लिंग टूल्स शेअरचा गुंतवणूकदारांना 105% परतावा, आता 100% डिव्हीडंड देणार, स्टॉक डिटेल्स पहा
x

स्वबळावर की मिळेल त्यात समाधान मानायचं? शिवसेनेचं काहीच ठरेना: सविस्तर

Shivsena, Uddhav Thackeray, Shivsena BJP Alliance, Maharashtra Vidhansabha Election 2019, Maharashtra Assembly Election 2019

मुंबई : विधानसभेला निम्म्या निम्म्या जागा वाटून घेण्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत जाहीर केल्यानंतरही प्रत्यक्षात कमी जागा घेत भाजपसोबत युती करायची की नाही, अशा द्विधा मनस्थितीत शिवसेना नेतृत्व अडकल्याचे कळते. शिवसेनेला १२० जागा देऊ पाहणाऱ्या भाजपचे गाडे काही केल्या पुढे सरकत नसल्याने कमी जागा घेऊन युती करायची की कसे याबाबत शिवसेनेच्या आमदार, नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशीच शिवसेना नेतृत्व संपर्क साधणार असल्याचे कळते.

निम्म्या जागांच्या प्रस्तावानुसार शिवसेनेच्या वाट्याला १४४ जागा येणार होत्या. त्यातील नऊ जागा शिवसेनेने मित्रपक्षांना सोडाव्यात असा सुरुवातीला भाजपचा आग्रह होता. मात्र मित्रपक्षांची साथ भाजपला असल्याने आपण कशाला जागा सोडायच्या अशी भूमिका शिवसेना नेतृत्वाने घेतली होती. मात्र नंतर त्यांनी १४४ मधील ९ जागा मित्रपक्षांना सोडण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे आता शिवेनेच्या वाट्याला १३५ जागा याव्यात असे शिवसेना नेतृत्वाचे म्हणणे होते. मात्र भाजपकडून या जागांसाठी अद्याप काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. उलटपक्षी शिवसेनेला जवळपास १२० जागा देण्याची तयारी असल्याचे प्रस्ताव भाजपकडून शिवसेनेला पाठविले जात आहेत.

साधारण १० जागांच्या वाटाघाटीवर एकमत होत नसल्याने युतीचं जागावाटपाचं घोडं पुन्हा अडलं आहे. त्यामुळे आज शिवसेना भाजपची संयुक्त पत्रकार परिषद होत युतीची घोषणा होण्याची शक्यता मावळली आहे. शिवसेना ११५ -१२५ आणि भाजप १७३ -१६३ अशा आकडेवारी दरम्यान एकमत होण्याचे प्रयत्न दोन्ही पक्षांकडून काल रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मात्र पुन्हा एकदा दोन्ही पक्षांनी ताठर भूमिका कायम ठेवल्याने जागावाटपाला अंतिम स्वरूप देणे अशक्य झाले.

त्यामुळे अंतिम टप्प्यात आलेली जागावाटपाची बोलणी अगदी शेवटच्या क्षणी पुन्हा रखडली आहेत. अर्थात नेमक्या कोणत्या जागांबाबत चर्चा पूर्ण होऊ शकलं नाही हे सुद्धा अजून स्पष्ट झालेले नाही. तेव्हा आता बघूयात विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना भाजपमधील जागावाटप कधी पूर्ण होत युती जाहीर केली जाते. रविवारी भाजप अध्यक्ष अमित शाह हे मुंबईत होते. पण यावेळी मात्र ते मातोश्रीवर गेले नाहीत. त्यामुळे आता युतीची भाजपला अधिक गरज नसल्य़ाची चर्चा होती. युतीबाबत आतापर्यंत अनेक फॉर्म्युले समोर आले आहेत.

नवरात्रीत शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत फैसला होणार आहे. परंतु, युती झाली किंवा नाही झाली तरी ठाण्यातील नेत्यांनी गेल्या नऊ महिन्यांपूर्वीपासूनच स्वबळाची तयारी सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी भाजपचा आमदार आहे, त्या ठिकाणी शिवसेनेतील संभाव्य उमेदवारांची निश्चिती झाली आहे.

भाजपवर कुरघोडी करण्यासाठी ठाण्यात शिवसेना सिद्ध आहे. युती तुटली तर जिल्ह्यातील शिवसेनेचे काही विद्यमान आमदार फुटण्याची शक्यता असल्याची माहिती शिवसेनेच्याच सर्वेक्षणातून उघड झाली आहे. त्यामुळे एकीकडे स्वबळाची तयारी तर दुसरीकडे विद्यमान आमदारांना फुटण्यापासून रोखण्याचे आव्हान पक्षासमोर आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x