18 April 2024 5:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

‘हॅपी बर्थडे’च्या नावाखाली मनसे शहराध्यक्षाला भाजपचा मफलर घालत पक्षप्रवेश घडवला? | काय सत्य?

Raj Thackeray

जळगाव, २३ ऑगस्ट | ‘हॅपी बर्थडे’च्या नावाखाली आपल्या पक्षाचा मफलर मनसे पदाधिकाऱ्यांच्या गळ्यात टाकून जळगावमध्ये एक भलताच प्रकार घडला आहे. कारण या हॅपी बर्थडेमध्ये दडलेला होता एक पक्ष प्रवेश. एक हास्यास्पद घटना वाटत असली तरी जळगाव शहरात नेमके असेच घडले आहे. चूक कुणाची किंवा पलटी कोण मारतोय ते निश्चित नसले तरी मनसे आणि भाजपवाल्यांची आणि मनसेची नाचक्की मात्र झाली आहे. शनिवारी हा प्रकार घडला आहे.

मनसे जळगाव शहराध्यक्ष निलेश अजमेरांच्या गळ्यात भाजपचा मफलर आला कसा? (Jalgaon MNS city president Nilesh Ajmera join BJP party or not) :

मनसे जळगाव शहराध्यक्ष निलेश अजमेरा यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली होती. मनसेला खिंडार पाडल्याचा दावा केला जात होता. दरम्यान, हा पक्षप्रवेश नसल्याचे सांगत अजमेरा यांनी भाजपला तोंडावर पाडले आहे. तर अजमेरा भाजपात आले होते असा दावा भाजपकडून आजही होत आहे.

फोटोचा दुरुपयोग करीत भाजपने अफवा पसरवली : अजमेरा
मी मनसे सोडून इतर कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नसून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाल्याचा खोटा प्रचार केला आहे. काल माझा वाढदिवस होता. माझ्या वाढदिवशी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व नेते यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी माझ्या गळ्यात भारतीय जनता पक्षाचे मफलर घातले व फोटो काढून निघून गेले. मात्र भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी या फोटोचा गैरवापर करत मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याची अफवा पसरवली, असे मनसे महानगराध्यक्ष निलेश अजमेरा यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.

अजमेरांच्या गळ्यात भाजपचा मफलर आला कसा? : सूर्यवंशी (Jalgaon MNS city president Nilesh Ajmera join BJP party or not)

शनिवारी निलेश अजमेर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला हे वृत्त खरे आहे. ते स्वतः जरी हे वृत्त फेटाळत असले तरी प्रवेशावेळी ते म्हणाले होते की, भारतीय जनता पक्षाचे विचार मला आवडतात म्हणून मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहे. आणि जर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला नाहीये तर त्यांच्या गळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा मफलर आला कसा? तर सवाल भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना उपस्थित केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Jalgaon MNS city president Nilesh Ajmera join BJP party or not news updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x