5 May 2024 5:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा
x

चुनावी जुमला! मतदान जवळपास संपण्याआधी शेतकऱ्यांच्या खात्यातील २,००० रुपये परत घेतले?

Narendra Modi, Loksabha Election 2019

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून केवळ ७व्या टप्प्याचे मतदान उरले आहे. मात्र त्यानंतर हळुवारपणे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात आलेले २,००० रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यातून काढून घेण्यात आल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडू लागले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संताप पसरला आहे.

सदर बातमी सध्या समाज माध्यमांवर असली तरी यूपीतील अनेक स्थानिक वृत्तपत्रांनी ही बातमी प्राधान्यांने छापली आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मोदी सरकारकडून अनुदान म्हणून प्रत्येकी २,००० रुपये टाकण्यात आले होते. त्यानंतर मोठ्या जाहिराती देखील प्रसिद्ध करून भाजपचे मंत्री मोठी मार्केटिंग सुद्धा करताना दिसले.

आता लोकसभा निवडणुकीचे मतदान जवळजवळ संपले आहे. आता राज्यातील काही शेतकऱ्यांनी आपल्या खात्यावरून २,००० रुपये परत घेण्यात आल्याच्या तक्रारी सुरु केल्या आहेत. मुजफ्फरपूरमधील जनपद भागातून अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. आपल्या खात्यातून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे दोन हजार रुपये अनुदान काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. बँकेत पैसे काढण्यास गेल्यानंतर खात्यावर पैसेच नसल्याचे समोर आले आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी अनुदान योजनेचे पैसे परत घेण्यात आल्याचे समजले. या संदर्भात संबंधित बँकेच्या कर्मचाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नसून त्यांच्या खात्यातील रक्कम कट करण्यात आली आहे. सदर घटनेनंतर किसान एकता संघटनेने बँकांच्या कृतीचा विरोध केला असून सरकारने शेतकऱ्यांना धोका दिल्याचे म्हटले आहे.

२ महिन्यापूर्वी खात्यावर २, ००० रुपये जमा झाल्याचा संदेश आला होता. परंतु आता बँकेत पैसे काढण्यासाठी गेलो तर कळलं की, खात्यात रक्कम नाही, असं फिरोजाबाद येथील शेतकरी निरोत्तम सिंह यांनी सांगितले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी सन्मान योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रतिएकर जमीनीप्रमाणे वर्षाला ६,००० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना ३ टप्प्यात मिळणार होती. परंतु पहिल्या टप्प्यातील २, ००० मिळाल्यानंतर ते काढून घेण्यात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x