15 December 2024 1:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

Pune Municipal Corporation Election | पुण्यात मनसेला हवी आहे भाजप सोबत युती | शहराध्यक्षांची प्रतिक्रिया

Pune Municipal Corporation Election 2022

पुणे, २७ सप्टेंबर | पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी (Pune Municipal Corporation Election 2022) भारतीय जनता पक्षासोबत युती करावी, असा आग्रह धरला आहे. दरम्यान, पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी यावर प्रसार माध्यमांकडे भाष्य केलं आहे.

Upcoming Pune Municipal Election 2022 MNS Pune is more interested to alliance with BJP for success :

मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग जाहीर झाल्यामुळे आम्हाला जड जाणार आहे. त्यामुळे भाजपसोबत युती झाली तर त्याचा फायदा होणार आहे. भाजपसोबत गेलो तर सत्तेत सहभागी होऊन शहराचा विकास करता येणार आहे, असं वसंत मोरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलंय. मात्र, भाजपसोबत युती करायची की नाही याबाबतचा अंतिम निर्णय हा राज ठाकरे घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच मनसे नेते अनिल शिरोदे आणि बाबू वागस्कर यांच्याशी याबाबत बोलणं झाल्याची माहितीही वसंत मोरे यांनी दिली आहे.

तत्पूर्वी, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नुकताच पुण्याचा दौरा केला होता. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पुण्यातील प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता होती. यादृष्टीने मनसेकडून अंतर्गत चाचपणी मोहीम सुरु होती. यावेळी मनसे नेत्यांच्या एका गटाने आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करावी, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Pune Municipal Corporation Election 2022 MNS Pune local leaders want alliance with BJP.

हॅशटॅग्स

#VasantMore(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x