14 November 2019 1:07 PM
अँप डाउनलोड

पश्चिम बंगाल: भाजपाची रथयात्रा रोखणाऱ्यांना आम्ही त्याच रथाखाली चिरडू

प. बंगाल : पश्चिम बंगालमधील ‘जे लोक आमची रथयात्रा रोखण्याचा प्रयत्न करतील त्यांना आम्ही त्याच रथाच्या चाकाखाली चिरडून टाकू’ असं वादग्रस्त वक्तव्य पश्चिम बंगाल राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्षा लॉकेट चॅटर्जी यांनी यांनी केल्याने खळबळ माजली आहे. मालदा जिल्ह्यात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. भाजपने प. बंगालमध्ये लोकशाही स्थापन करण्याच्या उद्देशाने ही रथयात्रा आयोजित केली आहे असं त्या म्हणाल्या.

भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी ३ रथयात्रा काढण्याचा निर्णय जाहीर केला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकी आधी ही रथयात्रा राज्यातील सर्व म्हणजे ४२ लोकसभा मतदारसंघात फिरणार आहे. ५, ७ आणि ९ डिसेंबरला ही रथयात्रा निघेल असं म्हटलं होतं. दरम्यान, रथयात्रेच्या समाप्तीनंतर भाजपाची कोलकाता येथे एक जाहीर सभा होणार असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मार्गदर्शन करणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, रथ यात्रा रोखणाऱ्यांना रथाच्या चाकाखाली चिरडू. या चॅटर्जी यांच्या वादग्रस्त विधानाचा सत्तारुढ तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच भाजपा नेते प्रक्षोभक वक्तव्ये करून राज्यातील शांतता भंग करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचा स्पष्ट आरोप केला आहे.

हॅशटॅग्स

#Amit Shah(175)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या