15 December 2024 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

व्हिडिओ व्हायरल: राम कदम व त्यांच्या कार्यकर्त्यांवर फिल्मलाईन'मधील नृत्य कलाकार संघटनेतील तरुणींचा गंभीर आरोप

मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्ह नाहीत. दहीहंडी उत्सवादरम्यान महिलांच्याबाबत केलेल्या विवादित वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांवर फिल्मलाईन’मधील ‘सिने डान्सर्स असोसिएशन’ या नृत्य कलाकार मुलींनी भाजप आमदार राम कदम तसेच त्यांचे सहकारी गंगेश्वर यांच्यावर दुसरी समांतर युनियन बनवून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

नम्रता जाधव या नृत्य कलाकार मुलीने ‘सिने डान्सर्स असोसिएशन’ या संघटनेचं ओळख पत्र दाखवत आम्हाला यावरच रोजगार मिळतो, असं समाज माध्यमांवर विषय सार्वजनिक करताना सांगितलं. विशेष म्हणजे तिच्या सोबत अनेक तरुणी उपस्थित आहेत, ज्यांना आमदार राम कदम आणि सेक्रेटरी गंगेश्वर यांच्या राजकारणाचा फटका बसून बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.

नम्रता जाधव या तरुणीने आरोप करताना म्हटलं आहे की, आमदार राम कदम आणि त्यांचे सहकारी तसेच सेक्रेटरी गंगेश्वर यांनी ‘ऑल इंडिया स्क्रीन डान्सर्स असोसिएशन’ या नावाने दुसरी समांतर संघटना स्थापन करून दुसऱ्या संपर्कातील कलाकारांना २००० ते ५००० हजार रुपये या दराने ओळख पत्र विकून आमच्या विरुद्ध काम करत आहेत. हा एकप्रकारे फसवणुकीचा विषय असल्याचं त्या तरुणींचं म्हणणं आहे. त्यामुळे सर्व रोजगार त्या पैसे घेऊन ओळख पत्र दिलेल्या परप्रांतीय लोकांना म्हणजे ‘ऑल इंडिया स्क्रीन डान्सर्स असोसिएशन’च्या सदस्यांना दिला जात आहे. त्यामुळे आता आम्हाला आत येण्यास प्रवेश सुद्धा नाकारण्यात येत असल्याचा गंभीर आरोप या तरुणींनी आमदार राम कदम यांचं नाव घेऊन केला आहे.

पुढे या तरुणीने बोलताना आमदार राम कदम यांच्या दहीहंडी दरम्यान महिलांबाबत केलेल्या विवादित वक्तव्याला उजाळा देताना म्हटलं आहे की, ‘तुम्ही दहीहंडही दरम्यान जे काही वक्तव्य केलं महिलांबाबत त्यात महिलांबाबत तुम्ही नक्की काय करणार आहात याची आम्हाला कल्पना नाही, परंतु आता आम्ही कामावर सुद्धा आलो आहोत, आणि आमचं काम सुद्धा काढून घेण्यात आलं आहे. परंतु तुम्ही दुसरी समांतर नृत्य कलाकारांची संघटना स्थापन करून इतरांना ५००० हजार रुपयांना त्या संघटनेची ओळख पत्र वाटून त्यांना २००० रुपयांमध्ये डान्स करण्याची आतमध्ये संधी देत आहात. आता आम्ही घरी बसलो आहोत, राम कदम तुम्हाला हवंय तरी काय? तुम्ही तरुणींच्या बाबतीत चुकीची विधानं तर करताच, पण आता आम्हाला बेरोजगार सुद्धा केलं तुम्ही? तुम्ही आणि गंगेश्वरने मिळून आम्हाला बेरोजगार केलं आणि आम्ही तीन तासांपासून येथे बाहेर उभे आहोत, परंतु आता आम्हाला आतमध्ये सुद्धा प्रवेश नाकारण्यात येत आहे आणि शूटिंगसाठी सुद्धा प्रवेश दिला जात नाही, असं नका करू, महिलांचा आदर करायला शिका कृपया’, असं स्पष्टीकरण देत नम्रता जाधव या तरुणीने सर्व पुरावे मोबाईलवर शेअर केले आहेत.

त्यामुळे आता भाजाप आमदार राम कदम अजून अडचणीत येण्याची शक्यता आहे. सध्या हा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असून त्याचे पुन्हा पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

व्हिडिओ: काय म्हटलं आहे त्या तरुणींनी?

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x