6 August 2020 3:43 AM
अँप डाउनलोड

एमपी'मध्ये सत्ता आल्यास शासकीय इमारती व परिसरात RSS च्या शाखांवर बंदी: काँग्रेस

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये विघानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारामध्ये राजकीय धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून दोन्ही बाजूंनी तिखट शब्दांचा मारा करण्यात येत आहे. सध्या प्रचारादरम्यान काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोपप्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडू लागल्याने संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

त्यात काँग्रेसने राज्यात सत्ता आल्याचा शासकीय इमारती आणि परिसरात लागणाऱ्या RSS च्या शाखांवर बंदी घालण्याचे आश्वासन थेट जाहीरनाम्यात दिल्याने भाजपचा जळपळाट झाल्याचे पाहावयास मिळत आहे. दरम्यान, काँग्रेसच्या या घोषणेमुले राज्यातील सत्ताधारी भाजपाने सुद्धा संतप्त प्रतिक्रिया दिल्याचे वृत्त आहे. कालच काँग्रेसने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आपले वचनपत्र सार्वजनिक रित्या जाहीर केले.

यामध्ये हिंदू मतदारांना काँग्रेसकडे आकर्षित कऱण्यासाठी सौम्य हिंदुत्वाचा नारा देण्यात आला आहे. तसेच मध्य प्रदेशात सत्ता आल्यास RSS च्या प्रभावाला आळा घालण्यासाठी थेट मध्य प्रदेशच्या सरकारी कार्यालये आणि परिसरात RSS च्या शाखा घेण्यावर बंदी घालण्यात येईल असे म्हटले आहे. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा शाखेमध्ये भाग घेण्याचे आदेश ताबडतोब रद्द केले जातील असं आश्वासन दिल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Congress(394)#RSS(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x