14 December 2024 1:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
x

Health First | कावीळ कशी होते | घरगुती आणि आयुर्वेदीक उपचार पद्धती

Home Remedies for Jaundice

मुंबई, १५ डिसेंबर: हिपेटायटिस म्हणजे यकृताला आलेली सूज. हिपेटायटिस ई हा व्हायरस दूषित पाणी वा दूषित अन्नातून आपल्या पोटात जातात. यकृतावर हल्ला करतात व आपण जी कावीळ म्हणतो ती याचमुळे होते. जिची लक्षणे पाहून व रक्ततपासणी करून निदान पक्के करता येते. यामध्ये रुग्णास थकवा व ताप येतो. डोळे पिवळे होतात व लघवी पिवळसर लाल होते. यकृताला सूज येते. रक्ततपासणीमध्ये बिलिरुबिन, एसजीओटी (SGOT), एसजीपीटी (SGPT), जीजीटी (GGT), हे नॉर्मलपेक्षा दुपटीने वाढलेले असते. हिपेटायटिस ई हा पंधरा वर्षांनंतरच्या व्यक्तींना होतो अशी माहिती तज्ज्ञांनी दिली दिली.

कावीळ कशी होते | घरगुती आणि आयुर्वेदीक उपचार पद्धती – Effective Home Remedies for Jaundice :

साधारण पावसाची सुरुवात झाली की,कावीळ डोकं वर काढायला सुरुवात होते. पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर काविळीचे रुग्ण वाढतात. दूषित अन्न किंवा पाण्याचे सेवन केल्याने हा बाजार बळावण्याची शक्यता अधिक असते. कावीळला संस्कृतमध्ये ‘कामीण’ असे म्हणतात. त्याचा अपभ्रंश करत त्याला कावीळ असे नाव पडले. कामला या शब्दाचा अर्थ सर्व इच्छा नाहीसा करणारा आजार असा आहे. कावीळ याला ‘हिपेटायटस बी’ असे म्हणतात. कावीळ बरी होऊ शकते. त्या आधी तुम्हाला काविळीची लक्षणे, कारणे, घरगुती उपाय आणि आयुर्वेदीक उपाय यांच्याबाबत माहिती हवी. जाणून घ्या काविळीविषयी सगळे काही.

नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) :
यामध्ये यकृतात फक्त चरबी जमा झालेली असते, पण यकृतावर सूज नसते.

नॉन अल्कोहोलिक स्टीटोहिपॅटायटिस (एनएएसएच) :
यामध्ये यकृतावर सूज आढळते आणि यकृत पेशी नष्ट होत असल्याची लक्षणे दिसून येतात.

लिव्हर सिऱ्हॉसिस :
यकृतामधील चरबीचे प्रमाण वाढत जाऊन यकृताची इजा वाढते आणि पेशी मोठ्या प्रमाणात नष्ट होऊन सिऱ्हॉसिस होतो.

कारणे : आहारातील चरबीचे योग्यरीत्या विघटन न झाल्यास त्याचे रूपांतर यकृतातील वाढलेल्या चरबीत होते. आहारात साखर, स्निग्ध पदार्थ जास्त असणे आणि बैठ्या जीवनशैलीमुळे हालचालींचा, व्यायामाचा अभाव असणे ही यामागची कारणे आहेत. स्थूलपणा, मधुमेह, थायरॉइड, इतर हार्मोन्सची कमतरता, कोलेस्टेरॉल किंवा ट्रायग्लिसेराइड्सचे रक्तातील वाढते प्रमाण यामुळेसुद्धा यकृतातील चरबी वाढते.

प्रत्येक लठ्ठ व्यक्तीला फॅटी लिव्हरची समस्या असू शकते. मधुमेहाच्या ७० ते ८० टक्के रुग्णांना फॅटी लिव्हर होण्याचा धोका असतो. बॉडी मास इंडेक्सद्वारे (बीएमआय) हा धोका लक्षात येऊ शकतो.

यापूर्वी फॅटी लिव्हरची समस्या वयाच्या पन्नाशी-साठीत दिसत असे. बदलती आहारशैली, तेलकट पदार्थांचे अतिसेवन, पिझ्झा-बर्गरसारख्या फास्टफूडमुळे आज तरुणांमध्ये हा आजार बळावताना दिसत आहे. बहुतांश स्थूल व्यक्तीमध्ये चरबीचे प्रमाण अधिक असू शकते. त्यामुळे सिऱ्हॉसिस वा कॅन्सरचीही भीती असते. साधारणतः सूज आलेल्या २० टक्के रुग्णांना सिऱ्हॉसिस होतो, त्यातील १०-११ टक्के रुग्णांमध्ये ते मृत्यूचे कारण ठरते.

काविळीची लक्षणे कोणती:
तुम्हाला कावीळ झाली की नाही हे ओळखायचे असेल तर त्याची काही लक्षणे देखील आहेत. तुम्हाला ताप आला असेल पण तुम्हाला तुमच्या तापाची लक्षणे वेगळी वाटत असतील तर तुम्हाला त्याची लक्षणे देखील माहीत हवी. जाणून घ्या काविळीच्या या लक्षणाविषयी.

थकवा जाणवणे:
ताप आल्यानंतर थकवा येणे अगदी स्वाभाविक असते. पण तुम्हाला सौम्य ताप आहे पण तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर तुम्हाला कावीळ असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे याची योग्यवेळी चाचणी करणे गरजेचे आहे.

बद्धकोष्ठतेचा वारंवार त्रास होणे:
बद्धकोष्ठतेचा त्रास देखील कावीळ झाल्यानंतर वारंवार होऊ लागतो. पोटात खडे होऊ लागतात. पोट साफ होत नाही.या काळात पोटाची चयापचय क्रिया बिघडलेली असते. त्याचा परिणाम तुमच्या पोटावर होतो आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ लागतो.

लघवी पिवळी होणे:
कावीळमध्ये रक्तातील लाल पेशींचे रुपांतर बिलीरुबीनमध्ये होते. त्यानंतर त्याचे रुपांतर बाईलमध्ये त्यांचे रुपांतर होते.ते लघवीच्या मार्गे शरीराबाहेर टाकले जाते.बिलीरुबीनचे प्रमाण वाढल्यामुळेच लघवी पिवळी होते. हे प्रमाण अधिक वाढले तर लघवी गडद पिवळी होऊ लागते.

सतत उलट्या होणे:
जर तुम्ही ताप साधा आहे असा समजून घरगुती इलाज करत राहिलात तर तुम्हाला काही दिवसांनी उलट्या होण्याचा त्रास होऊ शकतो.कावीळमध्ये उलट्या होणे अजिबात चांगले नाही. जर तुम्हाला या काळात उलट्या झाल्या तर तुम्ही तातडीने त्यावर इलाज करुन घेणे आवश्यक आहे.

पोटाच्या वरील भागात दुखणे:
पोटात पित्ताशयाचे खडे झाल्यामुळे पोटदुखीचा त्रास कावीळ झाल्यामुळे होते. कावीळ झाल्यानंतर अधून मधून पोट दुखत राहते.

वरचेवर सौम्य ताप येणे:
कावीळ झाल्यानंतर तुम्हाला वरचेवर ताप येत राहतो. काहींना ताप आला आहे असे म्हणता अंग थंड पडते. पुन्हा ताप येतो. त्यामुळे वरचेवर सौम्य ताप येऊ लागतो.

झपाट्याने वजन कमी होणे:
कावीळमध्ये काहीही खाण्याची इच्छा मरुन जाते. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. तुमचे वजन झपाट्याने कमी होते. त्यामुळे तुम्हाला अधिक अस्वस्थ वाटते.

नखं आणि त्वचा पिवळी पडणे:
कावीळ संपूर्ण शरीरात भिनल्यानंतर त्याची लक्षणे दिसू लागतात. तुमची नख इतवेळी गुलाबी दिसतात. पण कावीळ झाल्यानंतर तुमची नखं आणि त्वचा पिवळी दिसू लागतात.

डोळे पिवळे दिसणे:
ज्या प्रमाणे तुमची नखं आणि त्वचा पिवळी पडते अगदी त्याच प्रमाणे तुमचे डोळेही काविळीमध्ये पिवळे दिसू लागतात. कावीळ तपासण्यासाठी तुमचे डोळे आणि नखचं तपासली जातात. त्यामुळेच तुम्हाला कावीळ झाली हे लक्षात येते.

लगेच द्या डॉक्टरांना भेट:
जर तुम्हाला ताप असेल आणि वर सांगितलेली सारी लक्षणे तुम्हाला तुमच्यामध्ये दिसत असतील तर तुम्ही तातडीने त्यावर इलाज करणे आवश्यक आहे. तुम्हाला झालेला आजार कावीळच आहे याची खात्री करुन घेण्यासाठी तातडीने तुम्ही डॉक्टरांकडे जा आणि चाचण्या करुन घ्या तरच तुम्हाला त्याचे लवकरात लवकर निदान करता येईल. कावीळवर लसी उपलब्ध असून एकदा आजाराचे निदान झाल्यानंतरच त्यावर औषधोपचार सुरु करता येतात.

कावीळ होण्याची कारणे

अस्वच्छ पाण्याचे सेवन:
कावीळ हा आजार पावसाळ्यात डोकं वर काढतो. या दिवसाच काविळीच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसते. कावीळ हा संसर्गजन्य आजार असून अस्वच्छ पाण्याचे सेवन केल्यानंतर हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. पावसाच्या दिवसात अनेक ठिकाणी दूषित पाण्याची समस्या असते. तुमची प्रतिकारशक्ती कमी असेल आणि तुम्ही कुठेही पाणी पित असाल तर तुम्हाला याचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते.

बाहेरचे अति खाणे:
जर तुम्हाला बाहेर खायची सवय असेल तर कावीळ बळावण्यासाठी ते एक कारण बनू शकते. पावसात बाहेरच्या पदार्थांमध्ये वापरण्यात आलेले पाणी तुम्हाला त्रासदायक ठरु शकते. तुम्ही जर सतत बाहेरचे पदार्थ या दिवसात खात असाल तर तुम्ही अधिक काळजी घेणे गरजेचे असते.

मद्यपानाची सवय:
मद्यपानाच्या अति सेवनामुळे देखील तुमच्या यकृताला सूज येऊ शकते. त्यामुळे देखील तुम्हाला कावीळ होऊ शकते. जर तुम्ही मद्याचे अधिक सेवन करत असाल तर हे देखील कावीळचे कारण ठरु शकते. त्यामुळे तुम्हाला कावीळ झाल्यानंतर मद्यपान करु नका असे सांगितले जाते.

मलेरिया, टायफाईडनंतर होऊ शकते कावीळ:
मलेरिया आणि टायफाईडनंतर तुमच्या पेशी कमी होतात. अशावेळी तुम्हाला कावीळ होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्हाला काळजी घेणे आवश्यक असते.

काविळीवर घरगुती उपाय:
काविळीचे निदान झाल्यानंतर तुम्हाला काही घरगुती उपायही कावीळ कमी करण्यासाठी केले जातात. हे घरगुती उपाय फारच सोपे आणि सहज उपलब्ध होणारे आहे. त्यामुळे तुम्ही हे उपाय करुन पाहू शकता. यांचा कोणताही विपरीत परिणाम तुमच्या आरोग्यावर होत नाही.

उसाचा रस:
अनेकांना उसाचा रस आवडतो.इतरवेळीही हा रस आवर्जून प्यायला जातो.पण कावीळ झाल्यानंतर उसाचा रस प्यायला सांगितला जातो. काविळीसाठी उसाचा रस हा अत्यंत गुणकारी आहे. जर तुमच्याकडे उस असेल तर तुम्ही उस चावून खाऊ शकता. पण जर तुमच्याकडे उसाचे तुकडे नसतील तर तुम्ही उसाचा रस पिऊ शकता. उसाच्या रसामुळे तुमच्या शरीरात उष्णता निर्माण होते आणि रक्त तयार होण्याची प्रक्रिया सुरु होते. शिवाय तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे कावीळ झाल्यानंतर 3 ते 4 ग्लास उसाचा रस नक्की प्यावा.

टोमॅटोचा रस:
टोमॅटोचा रसही काविळीवर गुणकारी असतो. रोज सकाळी उठून तुम्ही एक पेलाभर टोमॅटोचा रस प्यावा. टोमॅटोचा रस नुसता पिणे शक्य नसेल तर त्यात मीठ आणि मिरपूड घालावे. त्यामुळे तोंडाला चव येईल.

मुळ्याचा रस:
वर सांगितल्याप्रमाणे काविळीमध्ये काहीही खाण्याची आणि पिण्याची इच्छा मरुन जाते. पण या दिवसात शरीराला उर्जा मिळण्यासाठी तुम्हाला चांगला आहार घेण्याची देखील गरज असते. पण या दिवसात भूक लागत नाही. म्हणूनच तुम्ही मुळ्याचा रस आहारात घेणे आवश्यक असते. मुळ्याची पाने खुडून त्याचा रस प्यायलाने तुमचे पोट साफ होते आणि तुम्हाला भूक लागते. त्यामुळे किमान एक ग्लासभर तरी मुळ्याचा रस प्यावा.

पपईच्या पानांचा रस:
पपईच्या पानांचा रस हा अनेक आजारांवर गुणकारी आहे. पपईची कोवळी पाने वाटून हा रस केला जातो. पपईच्या पानांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची क्षमता असते म्हणूनच तुम्ही पपईच्या पानांचा रस या दिवसात घ्यावा असा सल्ला दिला जातो. लक्षात ठेवा यासाठी तुम्हाला पपईची कोवळी पाने यासाठी निवडायची आहे.

लिंबाचा रस:
काविळीमध्ये तुमच्या यकृताला त्रास होतो. यकृताचे कार्य पूर्ववत आणि चांगले करण्यासाठी लिंबाचा रस मदत करु शकते म्हणून तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा लिंबाच्या रसाचे सेवन करावे. तुम्हाला आराम पडेल.

भिजलेले मनुके:
तुमच्या शरीरातील उर्जा वाढण्याचे काम ड्रायफ्रुट करु शकते. त्यातल्या त्यात ड्रायफ्रुटमधील मनुके कावीळीसाठी चांगले असतात. काळे मनुके रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते खा. काविळीनंतर साधारण 15 ते 20 दिवस मनुक्यांचे सेवन करा.

तुळशीची पाने:
तुळशीच्या पानातील औषधी तत्व कावीळ बरी करण्यासाठी चांगले असतात. त्यामुळे तुम्ही शक्य असल्यास या दिवसात पाने चावून खावी. एकावेळी तुम्ही 7 ते 8 पाने चावून खाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. शिवाय कावीळ कमी होण्यास मदत होईल.

आवळ्याचा रस:
काविळीवर आवळ्याचा रस गुणकारी असतो. कावीळ झाल्यानंतर एकदा तरी आवळ्याच्या रसाचे सेवन करावे.

आयुर्वेदीक उपचार पद्धती

कुटकी:
कुटकी ही एक हिमालयातील वनस्पती आहे. कावीळ झाल्यानंतर तुमची भूक मरते. अशावेळी भूक वाढवण्याचे काम कुटकी हे करते. बाजारात कुटकी चूर्ण मिळते. ज्याची चव थोडी तिखट आणि कडू असते. ही पूड तुम्ही पाण्यात घालून खाऊ शकता.

कुमारी आसव:
तुमच्या शरीरात रक्त वाढवण्याचे काम कुमारी आसव करते. कुमारी आसव काढा स्वरुपात मिळते. डॉक्टरांना विचारुन तुम्ही याचे सेवन करु शकता. साधारण 15 ते 20 मिली इतकेच याचे सेवन करायचे असते याच्या सेवनामुळे तुमचा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

आरोग्यवर्धिनी वटी:
आरोग्यवर्धिनी वटी ही देखील कावीळवर उत्तम इलाज आहे. आरोग्यवर्धिनी वटी ही गोळ्यांच्या रुपात मिळते. या आयुर्वेदीक औषधाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे तुम्ही ही घेऊ शकता. याशिवायही आरोग्यवर्धिनीवटीने भरपूर फायदे आहेत.

गुडुची पावडर:
गुडुची पावडर म्हणजेच गुळवेळ. हल्ली बाजारात गुळवेलची पावडर बाजारात मिळते. त्याचा थेट काढा करुन तुम्ही पिऊ शकता. कावीळ व्यतिरिक्त इतरही आजारांवर गुळवेळ किंवा गुडुची पावडर उपयुक्त आहे.

काविळीवर काय खावे आणि काय खाऊ नये

कावीळ झाल्यानंतर काही पथ्य पाळावी लागतात. ताप उतरल्यानंतर आणि कावीळ बरी झाल्यानंतर साधारण 15 दिवस तरी तुम्हाला साधा आहार घेणे आवश्यक असते. काही गोष्टी तुम्हाला आवर्जून खायच्या असतात तर काही गोष्टी तुम्हाला या काळात अजिबात खायच्या नसतात. काय खावे आणि काय टाळावे याची यादी खास तुमच्यासाठी

Jaundice Symptoms, Causes, Diagnosis :

हे खावे

भरपूर भाज्या:
तुमच्या पोटाचे आरोग्य या दिवसात बिघडलेले असते. त्यामुळे तुम्हाला थोडासा हलका आहार घेणे आवश्यक असते. या दिवसात शक्य असेल तर हिरव्या पालेभाज्यांचे भरपूर सेवन करा.भाज्यांमुळे तुमचे पोट साफ होण्यास मदत होते. शिवाय तुमच्या शरीराला आवश्यक असणारे घटक देखील भाज्यांमधून मिळतात.

फायबर असलेले पदार्थ:
तुम्हाला उर्जा मिळण्यासाठी फायबर युक्त पदार्थ देखील तुमच्या शरीरात जायला हवे. ओट्स, कॉर्नफ्लेक्स असे पदार्थ तुम्ही आवर्जून या दिवसात खा.

फळं:
या दिवसांमध्ये काहीही खाण्याची इच्छा नसते. पण तुमच्या शरीरात काहीतरी चांगले जावे असे वाटत असेल तर तुम्ही फळं खाऊ शकता. कावीळमध्ये तुम्हाला कोणतीही फळं खाण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे तुम्ही फलाहार या दिवसात आवर्जून घ्यायला हवा. उदा. पपई आणि आंबा यांसारखी फळं तुम्ही खायला हवी. ज्यामुळे तुमची पचनशक्ती वाढेल.

पाणी किंवा हर्बल टी:
या दिवसात तुम्हाला थोडेसे थकलेले वाटत असेल आणि तुम्हाला चहा प्यायची इच्छा असेल तर अशा दिवसात रोजचा चहा न पिता हर्बल टी प्या. म्हणजे तुम्हाला थोडा आराम मिळेल. तुमच्या शरीरात जितके पाणी जाईल तितके चांगले.

दूध आणि दूधाचे पदार्थ:
दूध आणि दुधाचे पदार्थ तर तुम्ही आवर्जून कावीळ झाल्यानंतर खायला हवे. दुधाचे पदार्थ म्हणजे पनीर, चीझ असे खाल्ल्याने तुम्हाला प्रोटीन देखील मिळते.त्यामुले तुमची इच्छा नसेल तरी अगदी थोडे का असेना तुम्ही खा!

हे खाऊ नये

मासांहारी पदार्थ:
तुमचे पोटाचे आरोग्य बिघडल्यामुळे तुम्हाला या दिवसात हलका आहार घेणेच महत्वाचे असते. म्हणूनच या दिवसात तुम्ही मासांहारी पदार्थ अजिबात खाऊ नका. यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास जास्त होऊ शकतो.

तेलकट पदार्थ:
तेलकट पदार्थांचे सेवनही या दिवसात चांगले नाही. कारण या पदार्थांच्या सेवनामुळेदेखील तुम्हाला त्रास होऊ शकतो. उदा. चायनीज, वडा, तेलकट पदार्थ अशा पदार्थांचे सेवन तुम्ही करु नका.

साखरेचे सेवन:
साखरेचे सेवन जर तुम्ही करत असाल तर या दिवसात करु नका. कारण साखरेमुळे तुम्ही केलेल्या डाएटवर पाणी फिरेल. जर तुम्हाला फारच गोड खायची इच्छा असेल तर तुम्ही गोड फळं खा. पण साखर किंवा साखर असलेले पदार्थ खाऊ नका.

अतिरिक्त मीठ आणि सोडिअम:
मीठाचे अतिरिक्त सेवन देखील या कालावधीत चांगले नाही. मीठ असलेले पदार्थ म्हणजे चीप्स किंवा असे काही पदार्थ तुम्ही या काळाच न खाल्लेले बरे

दारुचे सेवन:
दारुचे सेवनही या कालावधीत चांगले नाही. कारण त्यामुळे तुमच्या यकृताला सूज येण्याची शक्यता असते.म्हणून या दिवसात दारुचे सेवन टाळा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Effective Home Remedies for Jaundice.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x