2 May 2024 10:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या
x

भारतमाता की जय म्हणणाऱ्यांनाच देशात स्थान: केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान

Union Minister Dharmendra Pradhan, Bharatmata Ki Jai

नवी दिल्ली: ‘भारताला आपण धर्मशाळा करणार आहोत का, जो येईल तो येथे राहणार का, याचा विचार करून हे आव्हान आपल्याला स्वीकारावेच लागेल. भारतात ‘भारतमाता की जय’ म्हणावेच लागेल, भारत माता की जय म्हणणारेच देशात राहतील,’ अशा शब्दात पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांनी शनिवारी सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या वादाबाबत वक्तव्य केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, शहीद भगत सिंह, सुभाषचंद्र बोस यांच्या सारख्या महापुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली आहे. त्यांच्या बलिदान असे विसरून चालणार नाही. त्यामुळे या सर्वांना आठवून आपल्याला एक निर्णय घेतला पाहिजे की, देशात राहणाऱ्या व्यक्तीला ‘भारत माता की जय’ म्हणावेच लागेल. असेही यावेळी धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

यावेळी बोलताना धर्मेंद्र प्रधान यांनी एनआरसी, सीएए आणि लोकसंख्या सूची वरून विरोधकांना खडेबोल सुनावले. “देशाचे तुकडे करण्याची योजना आखलेल्यांचे अनुयायी आजही विरोध करत असल्याचा आरोप धर्मेंद्र प्रधान यांनी केला.

“चीनमध्ये सरकारच्या विरोधात कोण घोषणाबाजी करु शकतो का, देशात लोकशाही असून मतभिन्नता असू शकते वाद-विवाद होऊ शकतो. मात्र देशात सध्या नागरिकत्व कायदा तसेच लोकसंख्या सूची होऊ की नाही यावरुन वाद-विवाद होत आहे. जगात असा कोणता देश आहे. ज्या देशामध्ये तिथे राहणाऱ्या नागरिकांचा हिशोब ठेवला जात नाही”, असा सवाल प्रधान यांनी केला.

 

Web Title:  Place in the India called Bharatmata Ki Jai says by Union Minister Dharmendra Pradhan.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x