22 January 2022 4:09 AM
अँप डाउनलोड

पहिल्या कसोटीत भारतावर दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय

केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेचा तिसऱ्याच दिवशी पहिल्या कसोटीत दणदणीत विजय. भारता विरुद्धची पहिली कसोटी दक्षिण आफ्रिकेने सहज खिशात घातली. दक्षिण आफ्रिकेने भारतावर ७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. आता कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारतावर १-० अशी आघाडी घेतली आहे.

भारतासमोर विजयासाठी दक्षिण आफ्रिकेने २०८ धावांचे लक्ष्य दिलं होते. परंतु खेळ सुरु होताच भारतीय टीम ची टॉप ऑर्डर काही विशेष खेळ नं करताच पॅव्हेलियन मध्ये परतली. शिखर धवन आणि मुरली विजय अनुक्रमे १६ आणि १३ धावांवरच तंबूत परतले. तर चेतेश्वर पुजारा केवळ ४ धावा करून बाद झाला.

तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा फिलेंडर हा विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने कसोटीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ४२ धावांची खेळी करून भारताचे ६ फलंदाज सुध्दा तंबूत पाठवले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x