7 May 2021 9:57 AM
अँप डाउनलोड

पर्यावरणामुळे ऑस्ट्रेलियात #स्टॉप_अदाणी हॅशटॅग ट्विटरवर पेटला; ग्रेटाचा पुढाकार

Greta, Gautam Adani, Australia Coal Mine, Stop Adani Hash Tag

बर्लिन: ऑस्ट्रेलियात मागील आठवड्यात पेटलेल्या वणव्यानं संपूर्ण जगाच्या डोळ्यांत पाणी आलं. लाखो प्राण्यांना सूक्ष्म जीवांना, कीटकांना या आगीत आपला जीव गमवावा लागलाय. या आगीवरून आता भारतातील उद्योगपती गौतम अदानी चर्चेत आलेत. आगीनंतर अदानी उद्योग समूहाच्या ऑस्ट्रेलियातील खाण प्रकल्पासंदर्भात आढावा घेण्याची मागणी करण्यात आलीय. विशेष म्हणजे, ही मागणी पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनं केल्यानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेलयं.

BhagyaVivah Marathi Matrimonial

काय आहे ग्रेटानं आवाहन?

ऑस्ट्रेलियात अदानी उद्योग समूहाचा कारमायकेल कोळसा खाण हा प्रकल्प आहे. अदानी उद्योग समूहाला या कोळसा खाणीत ज्या रेल्वेचा वापर करावा लागतो त्यासाठी सिग्नल टेक्नॉनॉजी देण्याचं काम जर्मनीच्या सिमेन्स कंपनीला देण्यात आलंय. अदानी समूहाच्या वादग्रस्त कोळसा खाण प्रकल्पाविषयी सिमेन्सनं आढावा घ्यावा, असं आवाहन ग्रेटानं केलंय. हे आवाहन करताना तिनं ट्विटरवर #stopadaniअसा हॅशटॅगही सुरू केलाय. ग्रेटा थनबर्ग ही पर्यावरण बचाव मोहिमेचा जगाचा चेहरा बनली आहे. तिनं पर्यावणासाठी निसर्गात हस्तक्षेप करणाऱ्यांच्या विरोधात युवा चळवळ सुरू केलीय. ग्रेटानं ट्विट करताना, सिमेन्सपुढं आव्हान उभं केलयं. सिमेन्स कंपनीनं ठरवलं तर, ते अदानी उद्योग समूहाच्या वादग्रस्त कोळसा खाणीचं काम थांबवू शकतात किमान पुढं ढकलू शकतात, असं ग्रेटानं म्हटलंय. तसचं नागरिकांनी कंपनीला योग्य निर्णय घेण्यासाठी भाग पाडावं, असं आवाहन ग्रेटानं केलंय.

तत्पूर्वी, परदेशात नागरिक निसर्गाप्रती तसेच पशुपक्षांप्रती किती जागृत आहेत यांचं अजून एक उदाहरण समोर आलं होतं. कारण भारतातील मोठे उद्योगपती तसेच मोदींचे मित्र गौतम अदानी यांना ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड सरकारने चांगलाच झटका दिला होता. क्वीन्सलँडच्या स्थानिक सरकारने देशातील दुर्मिळ सफेद गळ्याच्या फिंच पक्षांच्या संरक्षणासाठी अदाणींच्या अब्जावदीच्या प्रकल्पाला स्थगिती दिली होती. तसेच तेथील स्थानिक नागरिक देखील अडणींच्या या खाण प्रकल्पाविरुद्ध रस्त्यावर उतरत होते आणि त्यामुळे सरकारवर देखील प्रचंड दबाव वाढला होता.

क्वीनलँड सरकारच्या म्हणण्यानुसार त्यांना अदानी समूहाच्या अटी मान्य नसल्याने कारमायकल खाणं प्रकल्प अनिश्चित काळासाठी बंद केला जाऊ शकतो. कारण अदानी समूहाकडून या खाणं प्रकल्पावर काम सुरु होताच येथे भूजल विषयीच्या आणि ‘फिंच’ या दुर्मिळ पक्षांच्या संरक्षणविषयीच्या समस्या मोठ्या प्रमाणावर समोर आल्या होत्या.

दरम्यान, अदानी कंपनीला स्थानिक राज्य सरकारकडून यापूर्वीच खनन आणि पर्यावरण विषयक मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर केवळ भूजल विषयीच्या आणि ‘फिंच’ या दुर्मिळ पक्षांच्या संरक्षणविषयीच्या मान्यता स्थानिक राज्य सरकारकडून शिल्लक होत्या. स्थानिक प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार २ मी रोजी क्वीनलँड सरकारच्या पर्यावरण खात्यातील अधिकाऱ्यांनी अदानी समूहाच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यामुळे सरकारच्या अधिकाऱ्यांनी ‘फिंच’ या दुर्मिळ पक्षांच्या संरक्षणाच्या विषयावरून अदानी समूहावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. स्थानिक सरकारकडून संबंधित खाणं प्रकल्पावर बंदी आणल्यानंतर, अदानी समूहाला या प्रकल्पाचा पुन्हा विचार करावा लागणार होता. अदानी समूहातील ऑस्ट्रेलियातील अधिकारी आणि संबंधित प्रकल्पाचे सीईओ लुकास डाऊ यांनी समूह सदर योजनेवर नव्याने काम करत असल्याचं म्हटलं होतं.

 

Web Title:  Greta started Stop Adani hash tag campaign against Gautam Adani Coal Mine in Australia after Environment issue gone serious.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x