मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे बंधू नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ जवळपास एक महिन्यापूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या प्रभागात वर्क ऑर्डरशिवाय काम सुरु असल्याचं लक्षात आल्यानंतर कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केली. तसेच कामगारांना हात पाय तोडण्याचीही धमकी दिली. या मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

कुर्ल्याजवळच्या चुनाभट्टी भागात रस्त्याचं काम सुरू होतं. तिथे ४ कामगारांना कप्तान मलिकांनी मारहाण केली. यापुढे इथे दिसलात तर हाय-पाय कापून ठेवीन, अशी धमकीही त्यांनी दिली.कप्तान मलिक यांनी रस्त्यावर सुरू असलेल्या कामावरून मारहाण केल्याने खळबळ उडालीय. रस्त्यावर एका ढिकाणी खोदकाम केलं होते आणि त्याठिकाणी फायबर केबलचं कामही सुरू होतं, या ठीकाणी मलिक आले आणि त्यांनी कामगारांकडून वर्क ऑर्डरची मागणी केली.

यावर कप्तान मलिक म्हणाले, “तो खासगी ठेकेदार होता. तो महापालिकेचं नुकसान करत होता. त्याला एक दिवस आधीपण मी समजावलं होतं. त्यांना विनंती करुन काम थांबवण्यास सांगितलं. त्यादिवशी त्यांनी काम बंद केलं. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा काम केलं. मला पुन्हा ते काम करताना दिसले. ते दादागिरीने काम करत होते. ती दादागिरी थांबवण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं.”

कालच राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी होय शरद पवार साहेब हे जाणते राजे आहेतच असं राजकीय घडामोडींवर प्रतिउत्तर दिलं. मात्र, त्याच जाणत्या राजाचे सैनिक असलेले आणि जवाबदार मंत्रीपदी विराजमान झालेल्या नवाब मलिक यांचे बंधू मात्र मुंबई शहराचे नवाब असल्यासारखेच वागत असल्याची चर्चा माध्यमांवर सांगली असून, त्यावरून राष्ट्रवादीच्या मुजोरीवर सडकून टीका करणं सुरु झालं आहे.

जाणत्या राजाचे सैनिक की मुंबईचे नवाब? कप्तानगिरीत कामगारांचे हातपाय तोडण्याची भाषा