12 December 2024 7:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML
x

चांगलं ते स्विकारण्याच्या वृत्तीवरून अरविंद केजरीवाल यांच्याकडून आ. रोहित पवारांना शुभेच्छा

NCP MLA Rohit Pawar, Delhi CM Arvind Kejriwal, School Eduction

नवी दिल्ली:  शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार विधानसभा निवडणुकीदरम्यान चांगलेच चर्चेत होते. पक्षाची चौकट सोडून लोकांमध्ये सहजपणे मिसळण्याच्या त्यांच्या स्वभावाचे अनेकांनी कौतुक केले होते. यानंतर आता आम आदमी पक्षाचे (आप) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी रोहित पवार यांना दिलेल्या शुभेच्छांमुळे ते पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत.

शिक्षणाच्या बाबतीत दिल्लीत नेमकं काय सुरु आहे? असं काय केलं अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने, ज्यामुळे साडेतीन वर्षात इथल्या सरकारी शाळांचं रुप पालटलंय? सरकारी शाळांचे रिझल्टही प्रायव्हेट शाळांपेक्षा चांगले येऊ लागले.

शिक्षणासारखा विषय जिथे अनेक राज्यांत शिक्षणसम्राटांच्या हातात गेलाय, तिथे दिल्ली सरकारला मात्र शिक्षण आणि आरोग्य या दोन बेसिक गोष्टींवर काम करावंसं वाटलं. काय आहे यामागची प्रेरणा, हा बदल जमिनीवर कितपत रुपांतरित झाला, जितकं हे मॉडेल चर्चिलं जातंय, तितकं ते यशस्वी झालंय का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लोंकांना कालांतराने मिळाली. सरकारी शाळांमध्ये स्विमिंग पूल वगैरे ही कल्पनाही कोणी केली नसेल. त्यात जिम, सलून क्लास, टुरिझम क्लास हे एवढं सगळं विद्यार्थ्यांना मिळतंय, जे खाजगी शाळांमध्येही मिळत नाही. ते आहे शिक्षणाचं ‘आम आदमी’ मॉडेल.

सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे अनेक तरुण आमदारांनी विधानसभेत प्रवेश केला आहे. त्यामुळे काही नव्या गोष्टी करण्याची इच्छा असणारे आमदार चौकटीच्या बाहेर पडून नव्या गोष्टी स्वीकारून, जे चांगलं आहे ते स्वीकारण्यास सज्ज झाले आहेत असंच म्हणावं लागेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला सादर केलेल्या ब्लू-प्रिंट’मध्ये त्यांचं एक वाक्य आहे आणि ते म्हणजे ‘परदेशात जे चांगलं आहे ते स्वीकारायला काय हरकत आहे’. नेमकं तसंच काहीस राष्ट्रवादीचे तरुण आमदार रोहित पवार करताना दिसत आहेत. अर्थात विषय परदेशातील नसून तो दिल्लीतील आहे, म्हणजे दिल्लीतील केजरीवाल सरकारने शिक्षण व्यवस्थेत केलेल्या आमूलाग्र आणि ऐतिहासिक बदलांचा विचार महाराष्ट्राने देखील करणं गरजेचं आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट दिल्ली गाठत केजरीवाल सरकारने उभ्या केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण व्यवस्थेला समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी त्यांनी प्रत्यक्ष सरकारी शाळांना देखील भेटी दिल्या आणि यावेळी त्यांच्यासोबत स्वतः आपचे नेते मनीष सिसोदिया देखील उपस्थित होते. त्यालाच अनुसरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना शुभेच्छा देताना म्हटलं आहे की, ‘भारत त्या दिवशीच खऱ्या अर्थाने विकसित होईल ज्यावेळी राजकीय पक्ष एकमेकांकडून चांगल्या गोष्टी स्वीकारतील, शिक्षण हे देशाला बदलण्यासाठी शिक्षण हे महत्वाचं माध्यम आहे’ असं अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केलं आहे.

 

Web Title:  Delhi CM Arvind Kejriwal greeting to NCP MLA Rohit Pawar.

हॅशटॅग्स

#Arvind Kejariwal(39)#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x