12 December 2024 6:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध आणि आंदोलनं | काँग्रेसचे २६ आमदार ईडीच्या रडारवर

Mission Punjab, ED preparing, major action, against 26 Congress MLA

चंदीगड, ८ नोव्हेंबर: केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी मजूर केलेल्या कृषी कायद्याला पंजाबमध्ये प्रचंड विरोध झाल्याचं पाहायला मिळालं होतं. विशेष म्हणजे पंजाबमध्ये मोदी सरकारच्या विरोधात आणि कृषी कायद्याच्या निषेधार्त मोठ्या प्रमाणावर मोर्चे देखील काढण्यात आले होते. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रावना ऐवजी मोदींच्या पुतळ्याचे दहन केलं होते.

दरम्यान, केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध करताना पंजाब काँग्रेसचे आमदार देखील मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. मात्र आता या पंजाब काँग्रेस केंद्रच्या निशाण्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा मुलगा रणइंदर यांच्या विरोधातील फाईल तब्बल ४ वर्षांनी पुन्हा उघडल्यानंतर ईडीने आता तब्बल २६ आमदारांवर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केल्याचं वृत्त आहे. यापूर्वी विरोधकांनी सीबीआय, ईडी आणि आयकर विभागाचा मोदी सरकार नेहमी गैरवापर किंवा सत्तांतरासाठी वापर करत असल्याचा आरोप केला आहे.

ईडीने बेकायदा उत्खनन प्रकरणी या आमदारांना नोटीस पाठविण्याच्या तयारीत आहे. ईडीची कारवाई होणार असल्याचे समजताच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून आमदारांपर्यंत सर्वांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या कारवाईसाठी ईडीला मोदी सरकारची देखील परवानगी मिळाली आहे. यामुळे ईडीच्या दिल्लीतील बड्या अधिकाऱ्यांनी जालंधरमध्ये तळ ठोकला असून ईडीच्या ऑफिसमध्ये फाईल्स तपासण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ईडीच्या चौकशीची व्यापीती वाढू लागली असून यामुळे मुख्यमंत्र्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे पंजाबमध्ये बेकायदा उत्खननाचा आरोप शिरोमणी अकाली दल आणि भारतीय जनता पक्षावरही झाला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाब निवडणुकीवेळी मतदारांना आश्वासन दिले होते. यामध्ये त्यांनी बेकायदा उत्खनन करणाऱ्यांना तुरुंगात टाकले जाईल आणइ खाण घोटाळ्यात जो महसूल बुडाला तो वसूल केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते.

 

News English Summary: A large number of Punjab Congress MLAs had also taken to the streets to oppose the Centre’s agriculture laws. But now it is seen that this Punjab Congress is being targeted by the Center. It is reported that after reopening the file against Punjab Chief Minister Amarinder Singh’s son Raninder after 4 years, the ED is now preparing to take action against 26 MLAs. Earlier, the opposition had accused the Modi government of misusing the CBI, ED and Income Tax department or using it for independence.

News English Title: Mission Punjab ED preparing for major action against 26 Congress MLA news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x