CAA चं लोकसभेत समर्थन राज्यसभेत यू-टर्न | कृषी विधेयकाला लोकसभेत पाठिंबा राज्यसभेत सभात्याग

मुंबई, २१ सप्टेंबर : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने कृषिविषयक तीन विधेयके लोकसभा आणि राज्यसभेत पारित करून घेतली आहे. काल संध्याकाळी राज्यसभेत प्रचंड गोंधळामध्येही ही विधेयके राज्यसभेत आवाजी मतदानाने पारीत करण्यात आली. दरम्यान, राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने लोकसभेत या विधेयकांना पाठिंबा दिला होता, तर राज्यसभेत विरोध केला होता. दरम्यान, शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकेवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे.
या विधेयकासंदर्भात शिवसेनेनं संसदेच्या दोन्ही सभागृहात वेगवेगळी भूमिका घेतल्यानं भाजपानं प्रश्न उपस्थित करत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करून शिवसेनेवर टीका केली आहे. “शिवसेनेनं सीएएचे लोकसभेत समर्थन आणि यू-टर्न घेऊन राज्यसभेत विरोध केला होता. आता कृषी विधेयकालाही लोकसभेत पाठिंबा आणि राज्यसभेत विरोधात भाषण करुन सभात्याग. म्हणजे महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत ‘सेम टू शेम!’ गल्लीत नुसताच गोंधळ आणि दिल्लीत सावळा गोंधळ!!”, असं म्हणत शेलार यांनी शिवसेनेवर त्यांच्या परस्परविरोधी भूमिकेवरून टीका केली आहे.
शिवसेनेने सीएएचे लोकसभेत समर्थन आणि यू-टर्न घेऊन राज्यसभेत विरोध केला होता..
आता कृषी विधेयकालाही लोकसभेत पाठींबा आणि राज्यसभेत विरोधात भाषण करुन सभात्याग..
म्हणजे
महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवना पर्यंत “सेम टू शेम!”
गल्लीत नुसताच
गोंधळ आणि दिल्लीत सावळा गोंधळ!!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 21, 2020
News English Summary: The ruling Shiv Sena had supported the bill in the Lok Sabha and opposed it in the Rajya Sabha. Meanwhile, BJP MLA Ashish Shelar has strongly criticized the Shiv Sena’s double standard.
News English Title: BJP MLA Ashish Shalar over Shivsena MP Sanjay Raut Agriculture Bills Agriculture Ordinances Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Advance Tax | तुम्ही ऍडव्हान्स टॅक्सच्या पहिला हप्ता भरला का? | ही तारीख चुकल्यास महागात पडेल
-
Mangal Rashi Parivartan | 27 जूनला मंगळ मेष राशीत प्रवेश करेल | १२ राशींवर काय परिणाम होईल जाणून घ्या
-
Gold ETF Investment | हा गोल्ड फंड 64 टक्के परतावा देत संपत्ती वेगाने वाढवतोय | तुम्ही गुंतवणूक केली आहे का?
-
Agneepath Scheme | सीमेवर देशासाठी सेवा बजावणं सुद्धा कंत्राटी नोकरीचा प्रयोग? | देशभर मोदी सरकारविरोधात रोष
-
Business Idea | गुंतवणूक न करता हा व्यवसाय सुरु करा | महिन्याला 50,000 रुपयांची कमाई
-
LIC Share Price | एलआयसीचे मार्केट कॅप 1 महिन्यात 31 टक्क्याने खाली | सामान्य गुंतवणूकदार पूर्ण फसला
-
Multibagger Penny Stocks | या २ रुपयाच्या शेअर गुंतवणूकदारांचं आयुष्य सार्थकी लागलं | 1 लाखाचे 2.5 कोटी झाले
-
Agnipath Scheme | मोदी सरकार अग्निपथ योजनेवर ठाम | उमेदवारांवर गुन्हे दाखल असल्यास संधी मिळणार नाही
-
Investment Tips | तुम्ही शॉर्ट टर्ममध्येही चांगला पैसा कमवू शकता | गुंतवणुकीच्या या ट्रिक फॉलो करा
-
5G Internet in India | तुमच्या इंटरनेट स्पीडमध्ये 10 पटीने वाढ होणार | ऑनलाईन उद्योगांनाही गती येणार