27 April 2024 9:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

२०१४ मधील व्यवहारावरून त्या म्हणाल्या | हे ऑफिस ऑफ ट्रस्ट की ऑफिस ऑफ प्रॉफिट?

Amruta Fadnavis, Thackeray family, Rashmi Thackeray

नवी दिल्ली, ११ नोव्हेंबर : अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते भाजपच्या नेत्यांसाठी देखील झगडताना दिसले नसतील तितकी बोंबाबोंब सध्या ते आता करताना दिसत आहे. त्यासाठी ते कोणत्याही अर्थहीन विषयाचा संबंध अन्वय नाईक आणि अर्णब प्रकरणाशी जोडताना दिसत आहेत. यापूर्वी देखील समाज माध्यमांवर अन्वय नाईक कुटुंबियांच्या राहणीमानावरून त्यांना लक्ष केलं होतं.

वास्तविक त्याचा आणि सध्याच्या अर्णब प्रकरणाचा काहीही संबंध नव्हता पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजकीय दृष्ट्या दाबण्यासाठी आदित्य ठाकरे आणि आता रश्मी ठाकरे यांना लक्ष करण्याचा घाट घातला आहे अशी राजकीय चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र याचा काहीही फायदा होईल असं सध्या तरी दिसत नाही. कारण आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांनी किरीट सोमय्यांना या विषयाचा नेमका आधार आणि अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण आणि रिपब्लिकने त्यांचे पैसे थकवणे याचा 21 मार्च 2014 मधील म्हणजे देशात मोदी सरकार येण्यापूर्वीच्या जमीन व्यवहाराशी काय संबंध असं विचारताच ते निरुत्तर दिसले. त्यांचा हेतू केवळ संभ्रम निर्माण करणं असल्याची त्यांची देहबोली सांगत होती.

किरीट सोमैया पत्रकार परिषदेत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि वास्तू सजावटकार अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा किरिट सोमय्या यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? असा सवाल किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. त्याचबरोबर ठाकरे आणि नाईक कुटुंबात झालेल्या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.

दरम्यान, यावरून अमृता फडणवीस यांनी देखील ठाकरे कुटुंबियांना लक्ष केलं आहे. याबाबत ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, ‘एखाद्या नेत्याने आणि त्याच्या कुटुंबाने काय ठेवले पाहिजे?, हे ऑफिस ऑफ ट्रस्ट की ऑफिस ऑफ प्रॉफिट? असं म्हणत टोला लगावला आहे.

 

News English Summary: What should a leader & his family hold, an office of trust or office of profit ? It’s high time we decide the destiny of those trading money for power said Amruta Fadnavis.

News English Title: Amruta Fadnavis criticized Thackeray family after allegations on Rashmi Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x