26 January 2025 1:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत अपडेट, शेअर BUY करावा की SELL, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: NTPCGREEN Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचे संकेत, जेफरीज ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी 23 रुपयाच्या मल्टिबॅगर शेअरवर फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: SBC SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, महिना SIP वर मिळेल 1.35 कोटी रुपये परतावा EPFO New Rule | खाजगी कर्मचाऱ्यांनो, EPFO ने नियम बदलले, कागदपत्रांशिवाय प्रोफाइल अपडेट करा, अन्यथा घामाचा पैसा गमवाल New Auto Taxi Fare | अच्छे दिन आ गए, बस, रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात मोठी वाढ, इतके पैसे मोजावे लागणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात दुपटीने वाढ, शेअर प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK
x

अर्णब गोस्वामी यांनी तुरुंगात वापरला मोबाईल | दोन पोलीस निलंबित

Arnab Goswami, phone use, Tihar jail, police suspended

रायगड, ११ नोव्हेंबर : इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी अंतरीम जामिनासाठी मंगळवारी सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेवर आज म्हणजे बुधवारी सुनावणी पार पडत असून न्यायालयात जोरदार युक्तिवाद सुरु झाला आहे. जस्टीस धनंजय चंद्रचूड आणि जस्टीस. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठात अर्णव गोस्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी सध्या सुरु आहे. मुंबई हायकोर्टाने सोमवारी याप्रकरणी अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता आणि कनिष्ठ कोर्टात जाण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अर्णव यांनी अधिवक्ता निर्निमेष दुबे यांच्याद्वारे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

दरम्यान या अपिलवर आज सकाळी १०.३० वाजता सुनावणी सुरु झाली आहे. मुंबई हायकोर्टाने ९ नोव्हेंबरला अर्णव गोस्वामी आणि इतर २ आरोपींना अंतरीम जामीन देण्यास स्पष्ट नकार दिला होता. तसेच कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्यास सांगितले होते. तसेच आरोपी आपल्या ‘बेकायदा अटके’ला आव्हान देत असतील आणि जामीन अर्ज दाखल करीत असतील, तर कनिष्ठ न्यायालय यावर ४ दिवसांत निर्णय देईल, असेही हायकोर्टाने म्हटले होते.

वास्तूविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी (anvay naik suicide case) अटकेत असलेले रिपब्लिक टीव्ही (Republic TV editor ) वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी (arnab goswami) तुरुंगात मोबाईल वापरत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे.

अर्णब गोस्वामीसह दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानुसार अर्णबसह नितेश आणि फिरोज यांना अलिबाग शहरातील नगरपरिषद एक नंबर शाळेत कैद्यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटर जेलमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी 6 नोव्हेंबरला अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी मोबाईल दिल्याची घटना घडली होती. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी जिल्हा कारागृह अधीक्षक ए. टी. पाटील यांना चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या कारवाईत दोन तुरुंग पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

 

News English Summary: Arnab Goswami, the editor of the Republic TV news channel, has been arrested in connection with the Naik suicide case. Two policemen have been suspended in connection with the case.

News English Title: Arnab Goswami phone use two jail police suspended in Raigad News updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x