20 April 2024 4:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

अर्णवला विशेष सवलत का? | बार असोसिएशनचा सुप्रीम कोर्टाच्या सरचिटणीसांना सवाल

SCBA President Dushyant Dave, Arnab Goswami, plea before Supreme court

नवी दिल्ली, ११ नोव्हेंबर : इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी अंतरीम जामिनासाठी मंगळवारी सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेवर आज म्हणजे बुधवारी सुनावणी पार पडत असून न्यायालयात जोरदार युक्तिवाद सुरु झाला आहे. जस्टीस धनंजय चंद्रचूड आणि जस्टीस. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठात अर्णव गोस्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी सध्या सुरु आहे. मुंबई हायकोर्टाने सोमवारी याप्रकरणी अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता आणि कनिष्ठ कोर्टात जाण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अर्णव यांनी अधिवक्ता निर्निमेष दुबे यांच्याद्वारे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

दरम्यान या अपिलवर आज सकाळी १०.३० वाजता सुनावणी सुरु झाली आहे. मुंबई हायकोर्टाने ९ नोव्हेंबरला अर्णव गोस्वामी आणि इतर २ आरोपींना अंतरीम जामीन देण्यास स्पष्ट नकार दिला होता. तसेच कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्यास सांगितले होते. तसेच आरोपी आपल्या ‘बेकायदा अटके’ला आव्हान देत असतील आणि जामीन अर्ज दाखल करीत असतील, तर कनिष्ठ न्यायालय यावर ४ दिवसांत निर्णय देईल, असेही हायकोर्टाने म्हटले होते.

दरम्याम देशभरात हजारो सामान्य नागरिक न्यायाच्या प्रतीक्षेत असताना आणि कोर्टासमोर प्रकरणे न आल्याने हजारोजण तुरुंगातच असताना रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना इतकी विशेष सवलत का दिली जाते,’ असा सवाल सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरचिटणीसांना पाठविले आहे. रिपब्लिकचे अर्णव गोस्वामी यांना जामीन नाकारल्याने त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून, त्यांच्या अर्जावर आज, बुधवारी सुनावणी सुरु झाली आहे आहे. यावर दवे यांनी आक्षेप घेतला आहे.

‘हजारो लोकांना सुनावणीच्या तारखा मिळत नाहीत, अनेक महिने सुनावणीसाठी थांबावे लागत असताना तुमच्या अधिकाराखालील रजिस्ट्रि अर्णव गोस्वामी यांची याचिका लगेच सुनावणीसाठी घेते हे गंभीर आहे. गोस्वामी हे केव्हाही कोर्टात आले तरी त्यांची याचिका लगेच सुनावणीसाठी घेतली जाते. यासंदर्भात आपल्याला सरन्यायाधीशांकडून काही विशेष आदेश आहेत का? सरन्यायाधीशांकडून थेट आदेश असल्याशिवाय विशेष पद्धतीने तातडीने सुनावणी घेतली जाणार नाही किंवा गोस्वामी यांना प्रशासकीय प्रमुख म्हणून तुम्ही किंवा रजिस्ट्रार विशेष प्राधान्य देत आहात,’ असा जोरदार आक्षेप दवे यांनी घेतला आहे.

 

News English Summary: Why is Arnav Goswami, editor-in-chief of Republic TV, given such a special privilege when thousands of ordinary citizens across the country are awaiting justice and thousands are still in jail for failing to appear before the court? ‘ Republican Arnav Goswami has been denied bail and has moved the Supreme Court, where his application is set to be heard on Wednesday. Dave has objected to this.

News English Title: SCBA President Dushyant Dave lodge strong protest against instant listing of Arnab Goswamis plea before Supreme court News updates.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x