12 December 2024 10:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

राहुल गांधींना काळजी, पण पंतप्रधान मोदी मणिपूरकडे अजिबात लक्ष देत नाहीत याचा आम्हालाही राग येतो, भाजपचे सहकारी खासदार कडाडले

MP Lorho Pfoze

MP Lorho Pfoze | मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले आहे. त्याचवेळी आता भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षांनीही प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. नागा पीपल्स फ्रंटच्या खासदारानेही असेच वक्तव्य केले आहे. लोर्हो पाफोज असे या खासदाराचे नाव आहे. आम्हाला संसदेत मणिपूरवर बोलायचे होते. पण त्यासाठी त्यांना मोदी सरकारकडून परवानगी मिळाली नाही.

पुढे ते म्हणाले की, ‘आम्ही भाजपचे मित्रपक्ष असू शकतो, पण आम्हाला जनतेचा आवाज उठवावा लागेल. विशेष म्हणजे मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधकांनी संसदेत अविश्वास ठराव आणला होता. यावेळी काँग्रेससह विविध विरोधी पक्षांनी सरकारला जोरदार घेराव घातला, पण आम्हाला रोखण्यात आलं.

भाजपच्या सहकारी खासदाराकडून राहुल गांधींचे कौतुक

यावेळी एनपीएफचे खासदार पाफोज यांनी राहुल गांधीयांचे भरभरून कौतुक केले. मणिपूरच्या विविध भागात भाजपकडून हिंसाचाराचे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आले आहे. आम्ही भाजपचे मित्रपक्ष आहोत, त्यामुळे आम्हाला काही आदेशांचे पालन करावे लागते आहे. राहुल गांधी यांचे कौतुक करताना लोर्हो पाफोस म्हणाले की, राहुल गांधी विरोधी पक्षाचे असूनही त्यांनी मणिपूरमध्ये येऊन ज्या पद्धतीने लोकांना भेटले त्याने आम्ही देखील खूप प्रभावित झालो आहोत.

पंतप्रधानांनी सुद्धा मणिपूरमध्ये जावे

इतकंच नाही तर मणिपूरच्या प्रकरणावरून एनपीएफच्या खासदाराने पंतप्रधान मोदींवर नाराजीही व्यक्त केली आहे. लोर्हो पाफोस म्हणाले की, पंतप्रधानांनी मणिपूरला जाऊन लोकांच्या जखमा भरून काढाव्या. ‘पंतप्रधान मणिपूरकडे अजिबात लक्ष देत नाहीत आणि मला याचा खूप राग आहे. पाफोजचा राग एवढ्यावरच थांबला नाही. ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने बिरेन सिंह यांना देखील खुली सुट दिली आहे. त्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. याआधीही फौजने बिरेन सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे.

News Title : Manipur BJP alliance MP Lorho Pfoze criticize PM Modi 12 August 2023.

हॅशटॅग्स

#MP Lorho Pfoze(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x