19 April 2024 9:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

३१ वर्षांच्या तेजस्वीने संपूर्ण भाजपा-जेडीयूला घाम फोडला | RJD सर्वात मोठा पक्ष

Bihar Assembly Election 2020, RJD is biggest party

पाटणा, ११ नोव्हेंबर : बिहार विधानसभेच्या प्रचारात देशातील दिग्गज नेत्यांना केवळ ३१ वर्षांचा तरुणाने घाम फोडला. निवडणुच्या प्रचारात देशभरातील भाजपा नेत्यांची फळी बिहारमध्ये पाहायला मिळाली होती. भाजपचे अनेक राज्यातील मुख्यमंत्री, आमदार आणि खासदार सुद्धा भाजपच्या प्रचारासाठी बिहारमध्ये तळ ठोकून होते. मात्र तेजस्वी यादव या तरुण नेत्यानेच खरी छाप सोडली आणि ती भविष्यात देखील कायम राहतील यात शंका नाही.

वडील लालू प्रसाद यादव तुरुंगात असताना देखील निराश न होता मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरून राष्ट्रीय पक्षांना घाम फोडला. तत्पूर्वी त्यांनी मतदारसंघाची बांधणी करण्याचे काम हळूहळू सुरुच ठेवले होते आणि तरुण हाच त्यांच्या केंद्रस्थानी होता. त्यांनी खरी बाजी मारली ती आकड्यांच्या खेळाची ज्यामध्ये निवडून येऊ शकतील असा उमेदवारांना तिकीट दिलं आणि स्थानिक पातळीवर देखील तुल्यबळ लढत स्थानिक उमेदवार स्वबळावर देखील देऊ शकेल याची काळजी घेतली होती. त्यांनी सुरुवातीपासून भाजपची प्रचाराची हवाच काढून टाकली होती. त्यांच्या सभांना गर्दी व्हायला लागली व तेजस्वी यांची सर्वत्र चर्चा सुरु झाली.

बिहारमध्ये NDA ची दिवाळी गोड झाली असली तरी भविष्यात भाजपने जेडीयू सोबत राजकीय काडी केल्यास तेथेही महाविकास आघाडीचा प्रयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आरजेडी आणि भाजप राज्यात वाढत असून जेडीयू राज्यातून कमी होती हि देखील महत्वाची बाब आहे आणि तेच महाराष्ट्रात शिवसेनेच्या बाबतीतही घडत होतं. जर शिवसेनेने पुन्हा भाजपसोबत जातं युती केली असती तर दिल्लीतील भाजपच्या चाणक्यांनी शिवसेना फोडण्याची मोठी योजना आखली होती असं म्हटलं जातं आणि परिणामी उद्धव ठाकरे वेळीच सावध झाले आणि धाडसी निर्णय घेत भाजपाला बाजूला सारले.

दरम्यान, भारतीय जनता पक्षप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात NDA ने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व २४३ जागांचे निकाल हाती असून NDA ने १२५ जागा मिळवल्या आहेत. या १२५ जागांमध्ये ७४ जागा भाजपाने, ४३ जागा जदयूने तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे महाआघाडीने ११० जागा मिळवल्या आहेत. यामध्ये सर्वात चांगली कामगिरी केली आहे ती राजदने. तेजस्वी यादव यांचा राजद हा ७५ जागा मिळवत बिहारमधला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महाआघाडीतल्या काँग्रेसला १९ जागांवर तर डाव्यांना १६ जागांवर विजय मिळाला आहे.

 

News English Summary: In the campaign for Bihar Assembly, only 31-year-old youth broke a sweat. In the election campaign, BJP leaders from all over the country were seen in Bihar. Many BJP chief ministers, MLAs and MPs were also camped in Bihar for the BJP’s campaign. But it is Tejaswi Yadav who left a lasting impression and will no doubt continue to do so in the future.

News English Title: Bihar Assembly Election 2020 final result is declared and RJD is biggest party with 75 seats news updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x