नवी दिल्ली : कर्नाटक निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप अध्यक्ष अमित शहा कर्नाटक राज्याच्या ३ दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी उत्तर कर्नाटकमधील एका सभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली.
कर्नाटक मध्ये होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या तुफान फैरी एकमेकांवर झाडल्या जाऊ लागल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधी यांची चक्क नक्कल करत टीकेला उत्तर दिले आहे.
राहुल गांधींच्या टीकेला उत्तर देताना अमित शहा म्हणाले की, आमच्याकडे ४ वर्षाच्या काळात केलेल्या कामाचा हिशेब मागता पण कर्नाटकची जनता तुमच्याकडे तुमच्या चार पिढ्यांचा हिशेब मागत आहे. परंतु हे उत्तर देताना त्यांनी चक्क राहुल गांधी यांची नक्कल केली आणि त्यामुळे उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली.
आता राहुल गांधी याला कसे उत्तर देतात याकडेच कर्नाटकमधील जनतेचे लक्ष आहे.
नक्की कशी अमित शहा यांनी नक्कल ?
#WATCH: BJP President Amit Shah mimics Rahul Gandhi while addressing Navashakthi Samavesha in #Karnataka‘s Bidar. pic.twitter.com/hfS8f3QT8A
— ANI (@ANI) February 26, 2018
