9 October 2024 3:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मालामाल करणार हा स्टॉक - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Marathi News Pension Life Certificate | डोअरस्टेप बँकिंग सर्विसच्या माध्यमातून जमा करा 'लाईफ सर्टिफिकेट', घरबसल्या होईल काम IPO GMP | पैसे तयार ठेवा, सर्वात मोठा IPO लाँच होतोय, ₹13720 मध्ये मिळेल 1 लॉट, संधी सोडू नका - Marathi News Singham Again Trailer | 'एक वचन के लिए वो लंका जलाने वाला है', 'सिंघम अगेन' मध्ये पाहायला मिळणार रामायणची झलक BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअर पुन्हा रॉकेट होणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Aditya Birla Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना 3200 बचतीवर मिळेल 1 कोटी रुपये परतावा
x

सरकारचा कारभार गचाळ, ढिसाळ आणि बेफिकिरीचा; शिवसेना

मुंबई : सभागृहातील गुजराती अनुवादावरून शिवसेनेने भाजपवर सामना दैनिकातून बोचरी टीका केली असून सरकारचा कारभार गचाळ, ढिसाळ आणि बेफिकिरीचा असल्याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे म्हटले आहे. तरी दुसऱ्या बाजूला ऐकू आलेला अनुवाद गुजराती असल्याचा विरोधकांचा आरोप सुध्दा सामानातून खोदून काढण्यात आला आहे आणि भाजपची अप्रत्यक्ष पाठराखण सुध्दा केली आहे.

सामना दैनिकातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली असून, महाराष्ट्रात सध्या जो तमाशा चालू आहे ते पाहून संयुक्त महाराष्ट्राचे १०५ हुतात्मे सुद्धा स्वर्गात अस्वस्थ झाले असतील. भाजपचेच नगरचे उपमहापौर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या बाबतीत अपशब्द वापरतात. त्यानंतर उपमहापौरांची हकालपट्टी होते आणि आता तर छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार आहे. महाराज्यांचा अपमान करणाऱ्यांना दयामाया नाही परंतु छिंदम प्रकरणात जशी लपवालपवी आणि बनवाबनवी झाली झाली तशीच अणखी एक बनवाबनवी मराठी भाषेच्या संदर्भात सुरु आहे.

अशाप्रकारे संधी मिळताच शिवसेनेने सामानातून भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x