15 August 2022 10:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Financial Tips | आर्थिक स्वातंत्र्यासाठी या 5 गोष्टी लक्षात ठेवा, सर्व आर्थिक चिंतांपासून होईल सुटका Numerology Horoscope | मंगळवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Old Salary Account | तुमच्या जुन्या सॅलरी अकाउंटमुळे तुम्हाला हे 5 नुकसान होतात, अशाप्रकारे लवकर बंद करा Ola S1 e-Scooter | ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, 141 किमी रेंजचा दावा, किंमतीसह सर्व माहिती जाणून घ्या Horoscope Today | 16 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Utsav Deposit Scheme | एसबीआयने सुरु केली उत्सव फिक्स्ड डिपॉझिट योजना, जाणून घ्या योजनेचे फायदे Gold Bond Scheme | तुम्हाला स्वस्त सोनं खरेदीची संधी मिळणार, जाणून घ्या कधीपर्यंत गुंतवणूक करू शकाल
x

इंटरनेट स्पीड च्या यादीत भारत पाकिस्तानच्याही मागे.

मुंबई : भारतात इंटरनेट सेवेचा वापर आणि प्रसार खूप वेगाने होत असला तरी इंटरनेट स्पीड च्या बाबतीत भारत पाकिस्तानच्याही मागे आहे अस नुकत्याच प्रसिध्द झालेल्या अहवालात सिध्द झालं आहे.

लवकरच जगभरात ५G सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. जगभरात इंटरनेट आणि ४G चा प्रसार जोरात होत असला तरी इंटरनेट स्पीडच्या बाबतीत खूप फरक जाणवतो. ओपेनसिग्नलने याबाबतचा अहवाल नुकताच प्रसिध्द केला असून त्यात बरीच आकडेवारी समोर आली आहे. या अहवालात इंटरनेट स्पीड या विषयावर विशेष अभ्यास करण्यात आला आहे.

ओपनसिग्नलच्या अहवालानुसार भारतात सध्या ४G इंटरनेट सेवेने ८६.३ टक्क्याने व्यापले आहे. ४G सेवा पुरविण्यात पाकिस्तान जरी भारताच्या मागे असला तरी इंटरनेट स्पीडच्या बाबतीत मात्र भारत पाकिस्तानच्याही मागे असल्याचे अहवालात समोर आले आहे.

भारतातील ४G इंटरनेटचा स्पीड ६.०७ MBPS आहे. तर पाकिस्तानमध्ये त्याचे प्रमाण १३.५६ इतके आहे म्हणजे भारताच्या ४G स्पीडच्या दुप्पट जी चिंतेची बाब आहे.

टॉप इंटरनेट स्पीड यादी खालीलप्रमाणे;

१. सिंगापूर : ४G स्पीड ४४.३१ MBPS
२. नेदरलँड : ४G स्पीड ४२.२० MBPS
३. नॉर्वे : ४G स्पीड ४१.२० MBPS
४. दक्षिण कोरिया : ४G स्पीड ४०.४४ MBPS
५. हंगेरी : ४G स्पीड ३९.१८ MBPS

तर एकूण देशांमध्ये सरासरी इंटरनेट स्पीड १६.९ MBPS इतका आहे.

हॅशटॅग्स

#4G Internet(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x