15 December 2024 3:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

मध्यप्रेदशात घडले; पण महाराष्ट्रात काळजी करण्याचे काहीच कारण नाही: शरद पवार

NCP President Sharad Pawar, Madhya Pradesh Govt, jyotiraditya scindia

नवी दिल्ली : काँग्रेसचा राजीनामा देणारे ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी जाहिररित्या भाजपचमध्ये प्रवेश केलाय. यावेळी त्यांच्यासोबत भाजप पक्षाध्यक्ष जे पी नड्डा हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी, ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांचे आभार मानले. तर कमलनाथ सरकारवर टीका करत ‘कमलनाथ सरकारनं घोर निराशा केल्याचं’ ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं. विजयाराजे यांचे नातू भाजपमध्ये आले याचा आनंद असल्याचं यावेळी जे पी नड्डा यांनी म्हटलं.

यावर महाराष्ट्राला अनुसरून खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले महाराष्ट्रात काळजी करण्याचे काहीच कारण नाही. मध्य प्रदेशात जे काही घडते तसे महाराष्ट्रात काहीही घडणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी महाविकास आघाडी होऊन राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेले सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार यांनी केलेल्या या विधानामुळे राज्यातील सरकारच्या भवितव्याबाबत उपस्थित होत असलेल्या शंकांना पूर्णविराम मिळाला आहे.

तत्पूर्वी, मध्यप्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याप्रमाणेच अनेक नेत्यांची आघाडी सरकारमध्ये कुचंबणा होत आहे. हे नेते त्यांचा पक्ष सोडून भाजपला येऊन मिळतील, असे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

 

News English Summery: Sharad Pawar has responded by following Maharashtra. He said there was no reason to worry in Maharashtra. As with what happens in Madhya Pradesh, nothing will happen in Maharashtra. Sharad Pawar expressed confidence that the government, led by Uddhav Thackeray, will complete its five-year tenure by leading the development of the Congress, NCP and Shiv Sena. This statement made by Sharad Pawar has given full pause to the doubts that are being raised about the future of the state government.

 

Web News Title: Story NCP President Sharad Pawars statement over future of Aahavikas Aghadi government.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x