29 March 2024 5:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

'लोकशाहीची हत्या हाच भाजपचा हेतू आहे', ज्योतिरादित्य शिंदेंचं ते ट्विट

Story Madhya Pradesh Jyotiraditya Scindia,

नवी दिल्ली: मध्य प्रदेशातील राजकीय भूकंप आणत काँग्रेसला धक्का देणारे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, मंत्री धर्मेंद्र प्रधान, उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे उपस्थित होते. ज्योतिरादित्य शिंदे उद्या भोपाळला जाणार असून ते १३ मार्चला राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या येण्याने आम्हाला आनंद होत असून त्यांना पक्षात मुख्य प्रवाहात काम करण्याची संधी मिळेस असे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले.

पुढे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, नरेंद्र मोदी यांना एकदा नव्हे दोनदा जो जनादेश मिळाला आहे तो याआधी कोणालाही मिळाला नव्हता. सक्रीय, समर्पित वृत्तीने काम करण्याच्या मोदींच्या वृत्तीमुळे संपूर्ण जगभरात आज भारताचे नाव झाले आहे. कोणत्याही योजनेची अंमलबजावणी कार्यक्षमतेने करण्याचे काम भाजप सरकारकडून केले जात आहे. त्यामुळेच भारताचे भविष्य नरेंद्र मोदींच्या हातात सुरक्षित आहे.

तत्पूर्वी, म्हणजे अगदी वर्षभरापूर्वी कर्नाटकावर घोंघावत असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी वक्तव्य केलं होतं. ‘थेट निवडणूक जिंकू शकले नाहीत म्हणून मागच्या दरवाज्यानं आता यांना सत्ता हस्तगत करायचीय आणि त्याला लोकशाहीची हत्त्या नाही म्हणावं तर काय’ असं त्यांनी म्हटलं होतं. पण आता मात्र त्याच भाजपसोबत हातमिळवणी करण्यासाठी ज्योतिरादित्य शिंदे निघालेले आहेत.

 

News English Summery: Jyotiraditya Shinde, who had been saying till a few days ago that ‘killing of democracy is the purpose of Bharatiya Janata Party’, joined the BJP. Only eight months ago, Shinde had made a statement in the wake of the political crisis that swept over Karnataka. He had said that he could now take power from the back door as he could not win a direct election. But now Jyotiraditya Shinde is leaving to join hands with the same BJP. So far Jyotiraditya, who has been critical of the BJP, has been seen with the ‘saffron party’.

Web News Title: Story Madhya Pradesh Jyotiraditya Scindia statements against BJP before joining party.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x