21 November 2019 7:23 AM
अँप डाउनलोड

सुप्रिया सुळे व शरद पवार हे धादांत खोटे बोलतात: विनोद तावडे

कोल्हापूर : राज्यातील अनेक शाळा बंद केल्याचा संदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे दोघेही धादांत खोटे बोलत असल्याचा आरोप राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

इतकंच नाही तर विनोद तावडे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना शाळा बंदच्या मुद्द्यावर खुल्या चर्चेचं आव्हान देखील आहे. एकूण १३०० पैकी ५४७ शाळांचे समायोजन केलं असताना, त्याबद्दल चुकीचं राजकीय वक्तव्य होत असल्याचं देखील शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले आहेत.

कोल्हापूर मध्ये सुद्धा डाव्या विचारसरणीची लोकं पालकांमध्ये भितीचं व संभ्रमाचं वातावरण निर्माण करत असल्याने, त्यांच्या अशा अपप्रचारामुळं बहुजन समाजातील विद्यार्थी चांगल्या शिक्षणापासून वंचित राहतील. त्यामुळे आमचं सरकार त्यांचा हा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार असं विनोद तावडे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(205)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या