2 May 2024 3:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

मुंबईची कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी संभाळणारे डॅशिंग पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या लेखी आदेशाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून तिलांजली

Mumbai Police

Mumbai Police | पोलीस दल हे शिस्तीचे खाते अशी पोलिसांची ख्याती आहे त्यात मुंबई पोलीस म्हटल्यावर विषय अधिकच गंभीर मानला जातो. परंतु याच मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या सार्वत्रिक बदल्या कार्यमुक्ती वरून पोलीस ठाणे व इतर शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे थेट मुंबईची कायदा व सुव्यवस्था जबाबदारी सांभाळणारे डॅशिंग सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सार्वत्रिक बदल्या संदर्भात कार्यमुक्ती करण्याचे लेखी आदेश गणेशोत्सवापूर्वीच देऊनही वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे त्यांच्या आदेशाला तिलांजली देत असल्याची माहिती एका कनिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर महाराष्ट्रनामा न्यूजच्या प्रतिनिधीला दिली आहे

सह पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील हे वेळोवेळी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टिकोनातून पोलीस आयुक्तालयात बक्षीस देऊन उत्कृष्ट अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार करत असतात आणि त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात परंतु सार्वत्रिक बदल्या झालेल्या कनिष्ठ अधिकारी व अंमलदारी यांच्या बदली कार्यमुक्ती करण्यासंदर्भातील लेखी आदेश गणेशोत्सवापूर्वीच देऊनही वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे मनुष्यबळ कमी असल्याचे सांगून बदली झालेल्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यास थेट विरोध दर्शवित आहेत.

अनेक वरिष्ठ पोलीस निरीक्षक आम्हीच पोलीस ठाणे चालवितो आम्हीच बॉस आहोत त्यामुळे तुम्ही कोणाकडे गेले तरी आमचेच ऐकले जाणार आम्हाला वाटेल तेव्हाच आम्ही तुम्हाला कार्यमुक्त करू असे बोलून कनिष्ठ अधिकारी व अंमलदार यांच्यावर दबाव टाकत आहेत विशेष म्हणजे सशस्त्र पोलीस दलातील एक मोठ्या दर्जाचा अधिकारी तसेच त्याच्या हाताखालील काम करणारा सहाय्यक पोलीस निरीक्षक हे येथील कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यासाठी तसेच आहे त्याच ठिकाणी ठेवण्यासाठी पैशाची मागणी करत असून त्या संदर्भात एका रिटायर पोलीस कर्मचाऱ्यांनी लेखी स्वरूपात गृहमंत्र्यांकडे तक्रार केली असल्याची माहिती दिली

वरिष्ठांनी पारित केलेले म्हणजे रजा बंदीचे आदेश साप्ताहिक सुट्टी बंदीच्या आदेश क्राईम रिपोर्टचे आदेश असे लेखी आदेश दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे तत्परतेने कनिष्ठ अधिकारी व मतदार यांच्यापर्यंत पोहोचवतो परंतु सह पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील यांनी गणेश उस्तव वापूर्वीच बदली झालेल्या ठिकाणी तात्काळ कार्यमुक्त करणे संदर्भात दिलेल्या लेखी आदेशाला मनुष्यबळ कमी असल्याबाबत चुकीची माहिती देऊन या आदेशाला जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचे या कनिष्ठ अधिकाऱ्याने महाराष्ट्राच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले

कनिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदार हेच पोलीस खात्याचा कणा आहेत असे वरिष्ठांकडून वेळोवेळी म्हटले जाते. परंतु याच कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या होऊन बरेच दिवस उलटूनही विश्वास नांगरे पाटील यांनी दिलेल्या लेखी आदेशानंतरही वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून वेगवेगळी कारणे सांगून तसेच गरज पडल्यास दबाव टाकून बदली झालेल्या ठिकाणी कार्यमुक्ती करण्यास दिरंगाई करत आहेत. लेखी आदेश देऊनही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून कोणतीच हालचाल होताना दिसत नसून असेच सुरू राहिल्यास भविष्यात देखील असे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून सरळ धुडकवले जातील, अशी माहिती त्या कनिष्ठ अधिकाऱ्याने महाराष्ट्र नामाच्या प्रतिनिधीला नाव न छापण्या अटीवर दिली

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mumbai Police transfer order implementation check details 14 September 2022.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x