15 June 2021 8:52 PM
अँप डाउनलोड

८ नोव्हेंबर हा पु.ल. देशपांडेची आठवण जागवण्याचा दिवस, उन्मत्त मोदी सरकारने काळा दिवस केला

Demonetization, MNS leader Ameya Khopkar, P L Deshpande

मुंबई: आज ८ नोव्हेंबर हा लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणाऱ्या पुलं देशपांडे यांच्या स्मृती जागवण्याचा दिवस. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने २०१६ मध्ये ८ नोव्हेंबरला ऐतिहासिक नोटबंदी जाहीर करून आज हा काळा दिवस करुन टाकला,” अशी खरमरीत टीका महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपर यांनी केली आहे. आज भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाईट परिस्थितीला कारणीभूत ठरलेल्या त्याच निर्णयाला ३ वर्ष पूर्ण झाली. त्याअनुषंगाने सर्वच थरातून मोदी सरकारवर टीका होताना दिसत आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

नेमकं काय म्हटलं आहे अमेय खोपकर यांनी पोस्टमध्ये;

“खरंतर, ८ नोव्हेंबर हा दिवस म्हणजे पु.ल. देशपांडे यांची आठवण जागवण्याचा दिवस पण उन्मत्त मोदी सरकारने ८ नोव्हेंबर म्हणजे काळा दिवस करुन टाकला. देशाच्या अर्थव्यवस्थेचे तीन-तेरा वाजवणाऱ्या नोटाबंदी निर्णयाला तीन वर्षं झाली. या आर्थिक आणीबाणीच्या काळात पुलंनी आणीबाणीविरोधात दिलेल्या लढ्याची प्रेरणा भारतीयांना मिळो, हीच अपेक्षा,” असं ट्विट खोपर यांनी केलं आहे.

दरम्यान, नोटबंदी निर्णयाच्या निषेधार्त युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करत सरकारचा निषेध केला आहे. दरम्यान, यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

तसेच, नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीचा निर्णय घेऊन १ हजार आणि ५०० च्या चलनी नोटा बंद केल्या. या निर्णयाला तीन वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे ट्विट केलं आहे. नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, तर अनेकांना त्यांचा जीव गमावावा लागला असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दुसरीकडे प्रियांका गांधी नोटबंदीवरून मोदी सरकारवर निशाणा साधताना म्हणाल्या की, नोटाबंदी ही देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारी एक ‘आपत्ती’ असल्याचे सिद्ध करत काँग्रेस नेते प्रियंका गांधी वड्रा यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर निशाणा साधला. नोव्हेंबर २०१९ मध्ये नोटाबंदीला ३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रियंकाने मोदी सरकारवर हल्ला केला.

त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे, “नोटाबंदीला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. सरकारने नोटाबंदी सर्व आजारांवरील एक इलाज असल्याच्या सरकारच्या दाव्यावर देखील प्रश्नचिन्हे उपस्थित होतं आहे. नोटबंदी ही एक आपत्ती होती, ज्यामुळे आपली अर्थव्यवस्था नष्ट झाली. आता या चुकीच्या निर्णयाची जबाबदारी कोण घेणार? “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर, २०१६ रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि राहुल गांधी यांच्यासह कॉंग्रेसचे सर्व नेते मंडळींनी देशातील आर्थिक मंदीला नोटाबंदीचा निर्णय जवाबदार असल्याचं यापूर्वीच म्हटलं आहे आणि त्यानंतर आता प्रियांका गांधी यांनी देखील प्रहार केला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधींनी नोटबंदी हा प्रमुख मुद्दा केला होता. काही दिवसांपूर्वी डॉ. मनमोहनसिंग म्हणाले की उत्पादन क्षेत्रातील विकास दर ०.६ टक्क्यांनी स्थिर राहतो हे त्रासदायक आहे. त्यामुळे स्पष्टपणे सूचित होतं की भारतीय अर्थव्यवस्था अद्याप नोटाबंदीपासून मुक्त झाली नाही आणि त्यात त्वरीत जीएसटी लागू केला आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x