15 May 2024 8:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील, असे नेत नाहीत - सामना

Chief Minister Uddhav Thackeray, MahaVikas Aghadi, Congress

मुंबई, १६ जून : राजकारण हे सत्तेसाठीच असते. सत्ता कोणाला नको असते? मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील, असे नेत नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे, हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कोणी चिंता करु नये, असे शिवसेनेने म्हटले आहे.

उद्धव ठाकरे सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री झाले. सरकारने सहा महिन्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. सरकार तीन भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन बनवले. त्या सरकारचे सुकाणू एकमताने उद्धव ठाकरे यांच्या हाती दिले. राज्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचाच निर्णय अंतिम राहील हे ठरले. स्वत: शरद पवार यांनी हे पथ्य पाळले आहे. काँग्रेस पक्षाचेही बरे सुरू आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठेवली पाहिजे, असा सल्ला देताना काँग्रेस पक्षाला टोला लगावला आहे.

तसेच विधान परिषदेच्या जागांवरूनही काँग्रेसला शिवसेनेने सुनावले आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार जागा वाटप व्हायला हरकत नसल्याचे सांगत त्यांना विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्यासाठी शिवसेनेने एक कॅबिनेट मंत्रिपद काँग्रेसला दिले, याचीही आठवण करून देण्यात आली आहे. काँग्रेसला जागांच्या प्रमाणात खूप काही मिळाले. समान वाटप झाले असते तर एवढे मिळालेच नसते, असा टोला लगावतना मुख्यमंत्र्यांना त्या बदल्यात सहा महिन्यांत कोणाची खाट कुरकुरली असे झाले नाही. यामुळे पुन्हा पहाटे राजभवनाचे दरवाजे उघडले जातील अशा भ्रमात राहू नये, असा इशारा काँग्रेससह भाजपाला देण्यात आला आहे.

काँग्रेस पक्षाचेही बरे सुरु आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनीआहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. आघाडीच्या सरकारात अधूनमधून असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठेवली पाहिजे. काँग्रेसचे प्रदेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे कुरकुरणेही तसे संयमी असते. मुख्यमंत्र्यांना भेटून काय ते बोलू, असे थोरातांनी सांगितले आहे. त्याच खाटेवर बसलेल्या अशोक चव्हाण यांनीही ‘इंडियन एक्सप्रेस’ला एक जोरदार मुलाखत दिली. तितक्याच संयमाने कुरकुरत सांगितले, सरकारला अजिबात धोका नाही. पण सरकारमध्ये जरा आमचेही ऐका. प्रशासनातील अधिकारी म्हणजे नोकरशाही वाद निर्माण करीत आहेत. आम्ही काय ते मुख्यमंत्र्यांशीच बोल! आता असे टरल्याचे समजते की, कुरकुरत्या खाटेवरचे हे दोन मंत्रीमहोदय मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांचे म्हणणे मांडणार आहेत.

 

News English Summary: Politics is for power. Who doesn’t want power? However, Chief Minister Uddhav Thackeray does not say that he will do anything for power. Everyone has a necklace of ministerial posts around their necks. It cannot be forgotten that Shiv Sena’s sacrifice is also important. Shiv Sena has said that no matter how crunchy the bed is, no one should worry.

News English Title: Chief Minister Uddhav Thackeray does not say that he will do anything for power News Latest Updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x