9 June 2024 6:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | NTPC सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल तगडा परतावा Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तुफान स्टॉक खरेदी सुरु NMDC Share Price | NMDC शेअरची रेटिंग अपग्रेड, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी IREDA Share Price | IREDA शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 09 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | टॉप ब्रोकरेजचा BEL शेअर खरेदीचा सल्ला, आली फायद्याची अपडेट, मोठा परतावा मिळणार Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाणून घ्या
x

LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर

LIC Share Price

LIC Share Price | एलआयसी कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळाली आहे. मागील काही दिवसापासून या सरकारी विमा कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक मजबूत वाढीचे संकेत देत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी एलआयसी स्टॉकवर 1270 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. ( एलआयसी कंपनी अंश )

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी एलआयसी स्टॉक 4.75 टक्के वाढीसह 934.10 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मागील 5 दिवसात एलआयसी स्टॉक 5 टक्के वाढला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 7 टक्के घसरले होते. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 97 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात एलआयसी स्टॉक 56 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने LIC स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किमतीपेक्षा 42 टक्क्यांनी अधिक वाढू शकतो.

शेअर बाजारातील एकूण 17 तज्ञापैकी 9 जणांनी LIC स्टॉकवर स्ट्राँग बाय रेटिंग दिली आहे. 3 जणांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा आणि 2 जणांनी हा स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. प्रवर्तकांनी LIC कंपनीचे 96.50 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. याशिवाय परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी मागील तिमाहीत आपला वाटा 0.06 टक्क्यांवरून 0.13 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपला वाटा 0.89 टक्क्यांवरून 0.79 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. म्युच्युअल फंडांनी देखील आपला वाटा कमी केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price NSE Live 14 May 2024.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x