
Yug Decor Share Price | मागील काही दिवसांपासून युग डेकोर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्के घसरणीसह 93.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या स्टॉक मध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
युग डेकोर लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 59 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 112 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 46 रुपये होती. नुकताच युग डेकोर लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. बोनस शेअर वाटपाची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने 5 ऑक्टोबर 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून घोषित केला आहे.
आज शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी युग डेकोर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.89 टक्के घसरणीसह 91.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. युग डेकोर लिमिटेड ही एक मल्टीबॅगर परतावा देणारी कंपनी आहे. युग डेकोर लिमिटेड ही कंपनी मुख्यतः विविध प्रकारचे विशेष रसायने बनवण्याचे काम करते. ही कंपनी वॉटर बेस्ड एड्डेसिव्स आणि सॉल्वेंट बेस्ड एड्डेसिव्स बनवण्याचे काम करते.
युग डेकोर लिमिटेड कंपनीने 2023-24 या चालू आर्थिक वर्षातील जून तिमाहीत मजबूत कामगिरी केली आहे. मागील 1 वर्षात युग डेकोर लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 170 टक्के परतावा कमावून दिला आहे. आणि मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 580 टक्के नफा कमावून दिला आहे.
18 नोव्हेंबर 2021 रोजी युग डेकोर कंपनीचे शेअर्स 15 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीपासून अवघ्या 2 वर्षांत हा स्टॉक 6 पट अधिक वाढला आहे. 7 जून 2022 रोजी युग डेकोर कंपनीचे शेअर्स 20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर या किमतीपासून हा स्टॉक 400 टक्के अधिक मजबूत झाला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.