7 May 2024 8:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Meson Valves India IPO | लॉटरीच लागली! मेसन वाल्व्स इंडिया IPO शेअरने पहिल्याच दिवशी 90 टक्के परतावा दिला, आता खरेदी करणार?

Meson Valves India IPO

Meson Valves India IPO | मेसन वाल्व्स इंडिया कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आणि 21 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे IPO शेअर्स सूचीबद्ध झाले आहेत. मेसन वाल्व्स इंडिया कंपनीच्या IPO शेअर्स 193.80 रुपये किमतीवर सूचिबद्ध झाले आहेत. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 102 रुपये निश्चित केली होती. आणि IPO स्टॉक 90 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाला आहे. म्हणजेच स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 90 टक्के नफा कमावला आहे.

मेसन वाल्व्स इंडिया कंपनीचा IPO 8 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होता. या IPO च्या माध्यमातून कंपनीने 31.09 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. आज शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी मेसन वाल्व्स इंडिया स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 213.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मेसन वाल्व्स इंडिया कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 1,200 इक्विटी शेअर्स ठेवले होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी 1,22,400 रुपये जमा करावे लागले होते. तर उच्च नेटवर्थ असलेले गुंतवणुकदार किमान 2 लॉट खरेदी करू शकत होते. यासाठी त्यांना किमान 2,44,800 रुपये जमा करावे लागले होते. पुणे स्थित मेसन वाल्व्स इंडिया कंपनी आपल्या IPO मधून उभारलेल्या निधीपैकी 11.37 कोटी रुपये प्लॉट आणि मशिनरी खरेदीसाठी खर्च करणार आहे. आणि 11.95 कोटी रुपये रक्कम खेळत्या भांडवलासाठी खर्च करणार आहे.

मेसन वाल्व्स इंडिया या कंपनीच्या प्रवर्तक गटामध्ये फ्युचरिस्टिक मरीन फर्म, रघुवीर नाटेकर, ब्रिजेश माधव मणेरीकर आणि विवेकानंद मारुती रेडेकर हे आहेत. मेसन व्हॉल्व्ह इंडिया ही कंपनी मुख्यतः नौदल, तेल आणि वायू उद्योग, वीज, रिफायनरी आणि सामान्य उद्योगांसाठी व्हॉल्व्ह, अॅक्ट्युएटर, स्ट्रेनर्स आणि रिमोट कंट्रोल व्हॉल्व्ह बनवण्याचे काम करते. ही कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही बाजारांमध्ये आपले उत्पादन विकते. या कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध करण्यात आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Meson Valves India IPO today on 22 September 2023.

हॅशटॅग्स

Meson Valves India IPO(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x