27 July 2024 11:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा
x

Shashijit Infra Share Price | शशिजित इन्फ्राप्रोजेक्ट्स शेअरची किंमत फक्त 40 रुपये, 1 महिन्यात मजबूत परतावा, खरेदी करावा का?

Shashijit Infra Share Price

Shashijit Infra Share Price | चालू आठवड्यात बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शशिजित इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.52 टक्के घसरणीसह 40.56 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शशिजीत इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीचा IPO स्टॉक सुरुवातीला फक्त BSE इंडेक्सवर सूचीबद्ध झाला होता.

त्यानंतर कंपनीने ऑक्टोबर 2018 मध्ये आपल्या पात्र शेअरधारकांना 1:5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने जबरदस्त कामगिरी करून आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. आज शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी शशिजित इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीचे शेअर्स 0.62 टक्के वाढीसह 40.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सेबीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध डेटानुसार शशिजित इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीने 1:5 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी 12 ऑक्टोबर 2018 या दिवशी एक्स-बोनस ट्रेडचे आयोजन केले होते. याचा अर्थ कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना 5 शेअर्सवर एक बोनस शेअर मोफत दिला होता. ज्या गुंतवणूकदारांनी आपले IPO स्टॉक होल्ड करून ठवले होते, त्यांच्या शेअरची संख्या बोनस शेअर्स वाटप केल्यानंतर 9,600 पर्यंत वाढली.

शशिजित इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीने IPO आपल्या IPO शेअरची किंमत बँड 15 रुपये प्रति शेअर जाहीर केली होती. एका लॉटमध्ये कंपनीने 8000 शेअर्स जारी केले होते. एक लॉट खरेदी करण्यासाठी किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 1,20,000 रुपये जमा करावे लागले होते.

शशिजित इन्फ्राप्रोजेक्ट या SME कंपनीचा IPO स्टॉक BSE इंडेक्सवर 15.85 रुपये प्रति शेअर किमतीवर सूचीबद्ध झाला होता. अशा परिस्थितीत ज्या गुंतवणूकदारांना IPO स्टॉक वाटप करण्यात आले, त्यांना स्टॉक लिस्टिंगमध्ये फक्त 5.50 टक्के नफा मिळाला. शशिजीत इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 15 रुपये निश्चित करण्यात आली होती आणि एका IPO लॉटमध्ये 8,000 शेअर्स ठेवण्यात आले होते.

गुंतवणुकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी 1.20 लाख रुपये जमा करावे लागले. सध्या या कंपनीचे शेअर्स जवळपास 41 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत म्हणजेच ज्या लोकांनी शशिजित इन्फ्राप्रोजेक्ट IPO मध्ये पैसे लावले होते, आणि बोनस शेअर्स मिळवले, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 3,93,600 झाले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Shashijit Infra Share Price today on 22 September 2023

हॅशटॅग्स

Shashijit Infra Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x