6 May 2024 5:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
x

Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड SIP ची जादू , छोटी गुंतवणूक करून 1 कोटी 13 लाख रुपयांचा परतावा, तुम्ही सुद्धा गणित समजून घ्या

Mutual fund SIP

Mutual Fund SIP | आज या लेखात आम्ही तुम्हाला अश्या एका म्युच्युअल फंडबद्दल माहिती देणार आहोत, यात तुम्ही छोटी गुंतवणूक करून भरघोस परतावा कमवू शकता.

गुंतवणूक दृष्टिकोन :
पैसे हे खर्च करण्यासाठी नसतात, तर ते गुंतवणूक करण्यासाठी असतात. दुसरीकडे, जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही गुंतवणूक नियोजन केले पाहिजे. या लेखात आम्ही तुमच्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा असा पर्याय आणला आहे, ज्याद्वारे तुम्ही छोटी गुंतवणूक करून जबरदस्त परतावा कमवू शकता. SIP हा देखील असाच एक पर्याय आहे, ज्याद्वारे तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक करून लक्षाधीश होऊ शकता. दीर्घकालीन गुंतवणुकीचा फायदा म्हणजे चक्रवाढ पद्धतीने तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर परतावा दिला जातो. जर तुम्ही योग्य वयात गुंतवणूक सुरू केली तर तुम्ही तुमच्या निवृत्तीच्या 15 वर्षा आधी करोडपती होऊ शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला SIP मध्ये गुंतवणूक करताना तिला वाढवत न्यावी लागेल.

एसआयपी कॅल्क्युलेटरसह परताव्याची गणना :
जर तुमचे गुंतवणुकीचे वय 20 वर्षे असेल आणि तुम्ही पुढील 25 वर्षे दरमहा 6,000 रुपये SIP मध्ये गुंतवणूक केली तर भविष्यात तुम्हाला करोडो रुपयांचा परतावा मिळेल. यावर तुम्हाला 12 टक्के वार्षिक या दराने परतावा मिळेल. बहुतेक लोक एसआयपीमध्ये पैसे गुंतवतात, कारण त्यात गुंतवणूक करणे सोपे आणि फायदेशीर आहे.

45 व्या वर्षी मिळेल एक कोटी परतावा :
SIP कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही मासिक 6,000 रुपये गुंतवणूक करत असाल आणि SIP मध्ये वार्षिक सरासरी परतावा 12 टक्के असेल तर पुढील 25 वर्षांत तुमच्याकडे 1 कोटी 13 लाख 85 हजार 811 रुपयांचा निधी तयार होईल. यामध्ये तुमची 25 वर्षांची एकूण गुंतवणूक १८ लाख रुपये असेल. त्याच वेळी, 95 लाख 85 हजार, 811 रुपये तुमचा परतावा असेल.

30 वर्षांत 2 कोटींहून अधिक परतावा :
गुंतवणुकीचा कालावधी जर आपण पाच वर्षांनी वाढवला तर 30 वर्षांसाठी तुमची एकूण गुंतवणूक 21,60,000 रुपये असेल. वयाच्या 50 व्या वर्षी तुम्हाला 2,11,79,483 कोटी रुपये परतावा मिळेल. परतावा गणनेमध्ये वाढता महागाई दर जोडलेला नाही.

जोखीम क्षमतेनुसार उत्पन्न, लक्ष्य, ठरवा :
एसआयपी ही गुंतवणुकीची एक मासिक गुंतवणूक पद्धत आहे. असे अनेक फंड आहेत ज्यांनी दीर्घ मुदतीत 12 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला थेट बाजाराच्या जोखमीला सामोरे जावे लागत नाही. त्याच वेळी, परतावा देखील पारंपारिक गुंतवणुकी पेक्षा जास्त मिळतो. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असल्यामुळे त्यात थोडीफार जोखीम असतेच. त्यामुळे गुंतवणूकदाराने आपले उत्पन्न, आर्थिक धेय्य आणि जोखीम क्षमता पाहूनच गुंतवणूक करावी. SIP च्या माध्यमातून तुम्हाला बचतीची सवय लागेल आणि, जबरदस्त परतावा मिळवू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual Fund SIP investment opportunities and return on 25 August 2022.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x