18 May 2024 11:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Brightcom Group Share Price | करोडपती करणारा हा शेअर 75% घसरून 28 रुपयावर, आता पुन्हा तेजीत, जोरदार खरेदी सुरु, कारण?

Brightcom Group Share Price

Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची खरेदी पाहायला मिळत आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.87 टक्के वाढीसह 28 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 3 दिवसात ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीचे शेअर्स 24 रुपये वरून 28 रुपयेवर आले आहेत. कंपनीने नुकताच स्टॉक मार्केट नियामक सेबीला आपल्या तिमाही निकालांबद्दल माहिती दिली. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 3 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल सादर केले जातील, आणि त्यावर चर्चा केली जाईल. मागील एक वर्षापासून या स्टॉक सातत्याने घसरण पहायला मिळत होती, मात्र आता अचानक स्टॉक तेजीत आला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Brightcom Group Share Price | Brightcom Group Stock Price | BSE 532368 | NSE BCG)

एका वर्षात शेअर्समध्ये 75 टक्के घसरण :
2022 पासून आतापर्यंत या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 75 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. याकाळात शेअरची किंमत 108 रुपयांवरून 23.80 रुपये पर्यंत आली होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या स्टॉकमध्ये 10 टक्के पडझड पाहायला मिळाली होती. गेल्या 6 महिन्यांत या स्टॉकने गुंतवणूकदारांचे 44 टक्के भाग भांडवल बुडवले आहे. ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीने 2021 मध्ये लोकांना 2,500 टक्के परतावा मिळवून दिला होता. त्याच वेळी 2022 मध्ये ही कंपनी भारतातील सर्वात वाईट कामगिरी करणारी कंपनी बनली होती.

स्टॉकमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव :
या कंपनीचे काही आर्थिक खुलासे आणि आर्थिक व्यवहार गुंतवणूकदारांसाठी हानीकारक ठरू शकतात अशी चिंता शेअर बाजार नियामक सेबीने व्यक्त केल्यानंतर स्टॉकमध्ये घसरण सुरू झाली होती. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने 2022 मध्ये ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या आर्थिक बाबींचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी ‘Deloitte Touche Tohmatsu India LLP’ या फर्मची नियुक्ती केली होती. सेबीने एखाद्या प्रकरणात वेगाने कारवाई करणे आणि आपली तपास यंत्रणा मजबूत करणे काळाची गरज बनली आहे, असे मत ‘लुथरा आणि लुथरा लॉ ऑफिस’ इंडियाचे तज्ञ हरीश कुमार यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Group Share Price 532368 BCG stock market live on 02 February 2023.

हॅशटॅग्स

#Brightcom Group Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x