27 April 2024 7:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

खडसेंनी लोटसचं ऑपरेशन सुरु करताच दिल्ली भाजप सतर्क | धाडली ED नोटीस

ED issues notice, NCP Leader Eknath Khadse

मुंबई, २५ डिसेंबर: भारतीय जनता पक्षामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली असल्याचे वृत्त आहे. या नोटीसनुसार एकनाथ खडसे यांना ३० डिसेंबर रोजी चौकशीसाठी ईडी समोर हजर राहावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, खडसे यांनी मात्र आपल्याला अद्याप अशी कोणतीही नोटीस मिळालेली नाही, असे स्पष्ट केले आहे.

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावरुन संताप व्यक्त केला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. “आमच्या शिवसेनेच्या लोकांनाही नोटीस आल्या आहेत. जे तुमच्या विरोधात आहेत, ज्यांच्याशी तुम्ही राजकीय सामना करु शकत नाही अशा लोकांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सकडून बळाचा वापर करुन नमवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तसं होणार नाही. यासाठीच विरोधी पक्षाने एकत्र यावं आणि मजबूत संघटन उभं करावं अशी आमची भूमिका आहे,” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला मोठी गळती लागली आहे. आता भारतीय जनता पक्षाला आणखी एक बसण्याची दाट शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार आणि दोन मोठे नेते लवकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. (BJP MLA from Khandesh will soon join NCP party through Eknath Khadse)

तत्पूर्वी म्हणजे राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी आता मी भारतीय जनता पक्षाला माजी राजकीय ताकद दाखवून देतो. आता आणि भविष्यात उत्तर महाराष्ट्रात केवळ एनसीपीच असेल, अशी राजकीय गर्जनाच एकनाथ खडसे यांनी केली होती. त्यामुळे भविष्यात उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या अडचणीत वाढण्याची शक्यता खरी ठरताना दिसत होती.

 

News English Summary: The Enforcement Directorate has reportedly issued a notice to Eknath Khadse, a senior leader of the Bharatiya Janata Party who joined the NCP. According to the notice, Eknath Khadse will have to appear before the ED on December 30 for questioning. Khadse, meanwhile, clarified that he has not yet received any such notice.

News English Title: ED issues notice to NCP senior leader Eknath Khadse news updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x