11 December 2024 5:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Yes Bank Share Price | सकारात्मक बातमी येताच स्वस्त येस बँक शेअर्सची उसळी, आज 3.27% वाढला, नेमकं कारण काय?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | आठवड्याच्या शेवटी येस बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार उलाढाल पाहायला मिळात आहे.  काही दिवसापूर्वी येस बँकेचे शेअर्स सतत विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मात्र शुक्रवारी या बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. आज सेबी ने शेअर बाजाराच्या विशेष सत्राचे आयोजन केले आहे. त्यामुळे आज शनिवार असूनही शेअर बाजार नेहमी प्रमाणे व्यवहार करत आहे.

येस बँकेच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, पेटीएमने येस बँकेसोबत व्यापारी खात्यांसाठी करार संपन्न केला आहे. त्यामुळे या बँकेचे शेअर्स शुक्रवारी तेजीत आले होते. आज शनिवार दिनांक 2 मार्च 2024 रोजी शेअर बाजाराच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 3.27 टक्के वाढीसह 25.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, पेटीएमने यूपीआयसाठी थर्ड पार्टी ॲप्लिकेशन म्हणून अर्ज केला आहे. NPCI ला दिलेल्या अर्जात, पेटीएमने येस बँक आणि ॲक्सिस बँकेसोबत करार केल्याची माहिती दिली आहे. पेटीएम कंपनीने याबाबत सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. ही बातमी येताच शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 2.6 टक्क्यांच्या वाढीसह 25.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या तेजीमुळे येस बँकेच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा रिकव्हरी पाहायला मिळाली आहे.

येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील 5 दिवसांत 2 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली होती. अशा स्थितीत शुक्रवारी येस बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली. मागील एका महिन्यात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3 टक्के परतावा कमावून दिला आहे. UPI व्यवहार क्षेत्रात येस बँकेने चांगली कामगिरी केली आहे. जानेवारी 2024 महिन्यात येस बँकेने UPI द्वारे 34,198 कोटी रुपये मूल्याचे पेमेंट केले होते. तर ॲक्सिस बँकेने 31,831 कोटी रुपये मूल्याचे व्यवहार केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 02 March 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x