28 April 2024 6:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

मराठी बाईचं कुंकू ज्याने पुसलं | त्याला वाचवण्यासाठी दिल्लीपासून सर्व नेत्यांचा प्रयत्न - शिवसेना

Minister Anil Parab, BJP Party, Arnab Goswami

मुंबई, ११ नोव्हेंबर: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Republic TV Editor Arnab Goswami) यांना करण्यात आलेल्या अटकेवरून सध्या राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. अर्णब गोस्वामी यांना कारागृहात ठेवण्यात आलं असून, याच प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (CM Uddhav Thackeray’ wife Rashmi Thackeray) आणि अन्वय नाईक कुटुबांतील व्यवहारावरून गौप्यस्फोट केला आहे. या जमीन व्यवहारात मनिषा रवींद्र वायकर (Manisha Ravindra Waikar) यांचंही नाव सोमय्या यांनी घेतलं आहे.

दरम्यान, या आरोपांना शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं. “किरीट सोमय्या पत्रकार अर्णव गोस्वामी यांना वाचवण्याकरता मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप करत आहेत”, अशी भूमिका अनिल परब (Minister Anil Parab) यांनी मांडली.

“किरीट सोमय्या हे अर्णव गोस्वामी यांना वाचवायला बघत आहेत. याचा अर्थ ते एखाद्या हत्याऱ्याला वाचवायचा प्रयत्न करत आहेत. एका मराठी बाईचं कुंकू ज्याने पुसलं, ज्यामुळे महिलेच्या पतीला आत्महत्या करावी लागली अशा माणसाला दिल्लीपासूनचे सर्व नेते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत”, असा आरोप अनिल परब यांनी केला.

 

News English Summary: Kirit Somaiya is making serious allegations against the Chief Minister to save journalist Arnav Goswami, said Anil Parab. Kirit Somaiya is looking to save Arnav Goswami. This means they are trying to save a killer. Anil Parab alleged that all the leaders from Delhi were trying to save the man who wiped the kumkum of a Marathi woman, which caused the woman’s husband to commit suicide.

News English Title: Minister Anil Parab criticized BJP Party over supporting Arnab Goswami news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x