26 May 2022 7:37 PM
अँप डाउनलोड

अंडर १९ विश्वचषक चौथ्यांदा टीम इंडियाकडे : टीम पृथ्वी विजयी

न्यूझीलंड : बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या टीमला अवघ्या ३८.५ षटकात नमवून टीम इंडियाने चौथा अंडर १९ विश्वचषक जिंकला. टीम पृथ्वी समोर एकूण २१७ धावांचे लक्ष समोर ठेवण्यात आले होते. भारताने तब्बल ८ गडी राखून ऑस्ट्रेलियाचा अगदी सहज पराभव केला.

यात महत्वाची भूमिका बजावली ती मनजोत कालरच्या धडाकेबाज शतकाने. मनजोतने एकूण १०१ चेंडूत १०२ धावा करत नाबाद राहण्याची महत्वाची खेळी केली. त्यामुळे भारताचा हा चौथा अंडर १९ विश्वचषक ठरला आहे.

अंडर १९ टीम इंडियाचा कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनजोतने चांगली सुरुवात करून दिली. परंतु पृथ्वी शॉ २९ धावांवर बाद झाल्यावर मनजोतने संयमाने खेळ करायला सुरुवात केली आणि भारताला भक्कम स्थितीत उभे केले. शुबमन गिल ३१ धावा करत बाद झाला.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या टीमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु जोनाथन मेर्लो च्या ७६ धावांची धमाकेदार फलंदाजी वगळता एकही ऑस्ट्रेलियन खेळाडू चमकदार कामगिरी करू शकला नाही आणि अखेर बलाढ्य टीम इंडियासमोर केवळ २१६ धावांचे लक्ष ठेवले.

भारतीय गोलंदाजांनी सर्वात महत्वाची भूमिका बजावली आणि शेवट पर्यंत ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर नियंत्रण ठेवलं. कमलेश, ईशान आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना तंबूत पाठवले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x