15 May 2021 10:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आपला शत्रू एक बहुरूपी आहे, तो कपडे बदलून फोटो काढत असतो - सुरेंद्र राजपूत ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस
x

मराठा आरक्षण | निकाल धक्कादायक | निर्णयाला राज्य सरकार आव्हान देणार

Maratha reservation, Decision to be challenged, Minister Ashok Chavan, Marathi News ABP Maza

मुंबई, 9 सप्टेंबर: मराठा आरक्षणाबाबत निकाल धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. या निर्णयाला आव्हान देणार असल्याची माहिती आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षणाला कोणतीही स्थगिती दिलेली नाही. हा अंतरिम आदेश आहे. हा विषय अंतिम निर्णयासाठी घटनापीठाकडे गेला आहे. त्यामुळे आरक्षणाला स्थगिती दिलेली नाही. अंतरिम आदेश दिलाय त्यात यापूर्वीच्या आरक्षणाला धक्का नाही. यंदाच्या नोकर्‍या आणि शैक्षणिक प्रवेशात आरक्षण नसेल. हा अधिकार घटनापीठाकडे आहे, असे चव्हाण म्हणालेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आरक्षणाबाबतीत कोणताही आदेश नाही, इतर आरक्षणाच्या खटल्यात असे आदेश नाहीत. पण मराठा आरक्षणासाठी दिलेला आदेश हा धक्कादायक आहे. सोमवारी मुख्य न्यायमूर्तींकडे याबाबत अर्ज करणार आहोत. उद्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत बैठक बोलवली आहे, कायदेतज्ज्ञांना बोलवलं जाईल. मुख्य न्यायमूर्तींकडे हा आदेश रद्द करावा यासाठी आव्हान देणार आहोत, असे ते म्हणालेत.

दरम्यान याच विषयाला अनुसरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी परखड प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,”आज मराठा समाजावर अन्याय झाला! आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली, हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या राष्ट्राच्या एकेक इंच जमिनीचे रक्षण करण्याकरिता, इथल्या संस्कृतीचे रक्षण करण्याकरिता सर्वात जास्त त्याग करणारा हा समाज आहे. त्या राष्ट्रभक्त समाजाला स्वतंत्र भारतात डावलले जात असल्याची भावना निर्माण होत आहे. राज्यघटनेच्या चौकटीत मराठा समाजालाही समतेची वागणूक मिळावी अशी अपेक्षा आहे.”

 

News English Summary: The order given for Maratha reservation is shocking. We will file an application in the Chief Justice on Monday. The Chief Minister has called a meeting tomorrow and legal experts will be called. “We will challenge the chief justice to overturn the order,” Minister Ashok Chavan said.

News English Title: Maratha reservation results shocking decision to be challenged Ashok Chavan Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#AshokChavan(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x