11 December 2024 9:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Sarkari Naukri | ७ जिल्ह्यांतील रखडलेल्या तलाठी पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा

Talathi recruitment 2020, talathi Bharti 2020, notification released, free job alert

मुंबई, २ डिसेंबर: मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टात अडकल्यामुळे रखडलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया राज्य सरकारने नुकतीच सुरु केली. त्यानंतर आता सात जिल्ह्यांमध्ये रखडलेल्या तलाठी पदाच्या भरतीचा (Talathi Recruitment 2020) मार्ग देखील महाविकास आघाडी सरकारने मोकळा केला आहे. त्यामुळे लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (State Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी ही माहिती दिली.

एकूण २६ जिल्ह्यातील तलाठी पदांची भरती (Talathi Bharti 2020) प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र ७ जिल्ह्यातील भरतीला स्थगिती देण्यात आली होती. अहमदनगरमध्ये या भरती प्रक्रियेत १० उमेदवार डमी असल्याचा संशय व्यक्त झाला होता. या संशयितांचा वगळून ही प्रक्रिया देखील सुरु होणार आहे.

थोरात म्हणाले, “बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा ७ जिल्ह्यातील तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या तलाठी पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठा आरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या एसईबीसी संवर्गातील (SEBC Category) पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे.”

तत्पूर्वी, औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, नांदेड, बीड, नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, अहमदनगर व पुणे विभागातील सोलापूर, सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने ४ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची नवीन पदभरती करू नये असे निर्देश दिले होते. त्यास अनुसरून ३१ जुलै २०२० रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे ज्या जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा जिल्हाधिकारी कार्यालयाने निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती न देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयांना देण्यात आले होते. पण आता सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिल्याने अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातील भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येतील, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले होते.

 

News English Summary: The state government has recently started the educational admission process, which has been stalled due to the Supreme Court’s decision on Maratha reservation. Since then, the Mahavikas Aghadi government has cleared the way for the recruitment of Talathis in seven districts. Therefore, appointments will be given to the selected candidates soon. This information was given by Revenue Minister Balasaheb Thorat. Recruitment process for Talathi posts in 26 districts was completed. However, recruitment in 7 districts was postponed. In Ahmednagar, it was suspected that 10 candidates were dummy in the recruitment process. Excluding these suspects, the process will also begin.

News English Title: Talathi recruitment 2020 notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(475)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x