19 February 2025 12:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC FD Interest Rates | HDFC बँकेच्या एफडीमध्ये 33,750 रुपये केवळ व्याजाने मिळतील, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | पत्नीच्या नावाने पोस्टाच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा, मिळेल भरभरून लाभ, लाखोंच्या घरात पैसे कमवाल Realme P3x 5G | 'हा' ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करा केवळ 15,000 रुपयांत, मिळेल प्रीमियम लेदर आणि डिझाईन देखील नवीन IRFC Share Price | मल्टिबॅगर आयआरएफसी शेअरबाबत मोठे संकेत, शेअर प्राईस 50 रुपयांपर्यंत घसरणार का - NSE: IRFC Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर घसरतोय, पण पुढे पैसे डबल होऊ शकतात, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS RVNL Share Price | रुळावरून घसरतोय हा रेल्वे कंपनी शेअर, स्टॉकबाबत तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - NSE: RVNL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरमधील घसरण थांबेना, मात्र तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत - NSE: JIOFIN
x

Points Table IPL 2021 | ‘मुंबई इंडियन्स’ आत की बाहेर? | कसं ठरणार?

Points Table IPL 2021

अबुधाबी, 08 ऑक्टोबर | दडपणाखाली कामगिरी उंचावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई इंडियन्सला अद्यापही यंदाच्या हंगामात बाद फेरी गाठता आलेली नाही. त्यामुळे शुक्रवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या ‘आयपीएल’मधील निर्णायक साखळी सामन्यात पाच वेळा विजेत्या मुंबईला ‘जिंकू किंवा मरू’ या धोरणासह खेळावे (Points Table IPL 2021) लागणार आहे.

Points Table IPL 2021. Punjab Kings defeated Chennai Super Kings by six wickets comprehensively in Dubai on Thursday, it was not enough as Kolkata Knight Riders’ 86-run win not only strengthened their chances of securing the final Playoff berth :

भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंडियन प्रिमियर लीगमध्ये खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीमधून जवळजवळ बाहेर पडल्यात जमा आहे. मात्र आज सनरायझर्स हैदराबादविरुद्द होणाऱ्या सामन्यामध्ये त्यांना चमत्कार वाटावा अशी कामगिरी करण्याबरोबरच नशिबाची साथही फार गरजेची आहे.

आयपीएल’मधील निर्णायक साखळी सामन्यात पाच वेळा विजेत्या मुंबईला ‘जिंकू किंवा मरू’ या धोरणासह खेळावे लागणार असलं तरी सामन्याच्या निकालाआधीच नाणेफेकीचा निकाल मुंबईला सामना जिंकून प्लेऑफमध्ये जाता येईल की नाही हे निश्चित करणार आहे. म्हणजेच अगदी साध्या भाषेत सांगायचं तर केवळ नाणेफेकीच्या आधारेच मुंबईचे प्लेऑफचे दरवाजे बंद होणार की सामना थाटात जिंकून मुंबई प्लेऑफमध्ये प्रवेश करणार हे निश्चित होणार आहे.

कोलकात्याने राजस्थानला पराभूत केल्याने राजस्थानचं आव्हान संपुष्टात आलं आहे. राजस्थानबरोबरच सनराईजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जचंही स्पर्धेतील आव्हान संपलं आहे. कोलकात्याने आपल्या १४ सामन्यांपैकी ७ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. मुंबईचा एक सामना बाकी असून त्यांनी जो जिंकला तर त्यांचे सुद्धा १४ सामन्यांमध्ये ७ विजय होतील. मात्र नेट रनरेटच्या बाबतीत कोलकाता सध्या +०.५८७ वर आहे तर मुंबई +०.०४८ वर आहे. त्यामुळे मुंबईने सामन्य पद्धतीने सामना जिंकला तरी ते जास्तीत जास्त पंजाबच्या वर सरकतील आणि त्यांना पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागेल. कारण नेटरन रेटच्या जोरावर मुंबई अव्वल चार संघांमध्ये जाणार नाही.

Points-Table-IPL-2021

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Points Table IPL 2021 who will chances of securing the final Playoff.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IPL2021(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x