20 April 2024 6:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Lakhimpur Kheri Violence | सुप्रीम कोर्टाच्या कठोर भूमिकेमुळे यूपी सरकारवर मंत्र्याच्या मुलाच्या अटकेसाठी दबाव वाढला

Lakhimpur Kheri Violence

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर | लखीमपूर खिरीत ४ शेतकऱ्यांसह ८ जणांच्या मृत्यू प्रकरणात (Lakhimpur Kheri Violence) सुप्रीम कोर्टाच्या कठोर प्रश्नांमुळे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिषच्या अटकेसाठी दबाव वाढला आहे. यूपी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी आशिषच्या घरावर नोटीस चिकटवून शुक्रवारी सकाळपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्याआधी पोलिसांनी लवकुश आणि आशिष पांडेय यांना अटक केली, तर इतर तिघांची चौकशी सुरू आहे.

Lakhimpur Kheri Violence. The Supreme court has decided to take up the case amid a growing outcry over the Uttar Pradesh police’s handling of the investigation, media reports and a letter written to the Chief Justice by two lawyers from the state :

सुप्रीम कोर्टाने दोन पत्रांची दखल घेतली. या घटनेत किती शेतकरी मारले गेले, किती राजकीय लोकांचा आणि पत्रकारांचा मृत्यू झाला, कोणाविरुद्ध गुन्हा नोंदला गेला, कोणाची अटक झाली, अशी विचारणा कोर्टाने यूपी सरकारकडे केली. यूपी सरकारला या प्रकरणी शुक्रवारी उत्तर द्यायचे आहे. नंतर सुनावणी होईल. दूसरीकडे, यूपी सरकारने गुरुवारी सकाळीच हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रदीप श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय चौकशी आयोग स्थापन केला आहे.

दुसरीकडे, कुरुक्षेत्रचे भाजप खासदार नायाब सैनी यांच्या कारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना धडक देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप हरियाणातील अंबालात शेतकऱ्यांनी केला आहे. या घटनेत एक शेतकरी जखमी झाला. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा खासदार आणि त्यांचे समर्थक कार्यक्रमानंतर बाहेर जात होते तेव्हा चकमक झाली, पण कुठल्याही दुर्घटनेची माहिती आम्हाला नाही.

प्रियंका, अखिलेश यांनी घेतली शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट:
शेतकरी गुरविंदर यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींना पोलिसांनी रोखले तेव्हा त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. नंतर प्रशासनाने परवानगी दिली. सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मोहालीहून लखीमपूरकडे निघालेले पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धूंना सहारनपूरमध्येच रोखण्यात आले.

लखनऊ परिक्षेत्राच्या पोलिस महानिरीक्षक लक्ष्मी सिंह यांनी सांगितले की, आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात आम्हाला यश मिळेल, अशी खात्री आहे. आशिष मिश्रा सध्या कुठे आहे, हे आम्हाला माहीत नाही. दरम्यान, आशिष पांडेय आणि लवकुश हे थार जीपच्या मागे जात असलेल्या वाहनात होते, असा आरोप आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Lakhimpur Kheri Violence Supreme Court Asks UP To File Report On Farmers Killings Tomorrow.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x