11 December 2024 6:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

NCB and Criminal Gosavi | फसवणूक, धमकी देणे असे ३ गुन्हे दाखल असलेला फरार गुन्हेगार NCB सोबत कारवाईत सामील

NCB and Criminal Gosavi

मुंबई, 08 ऑक्टोबर | गोसावी कार्डेलिया क्रूझवरील कारवाईवेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या बरोबरीने सहभागी असल्याचे उपलब्ध व्हिडीओ व फोटोवरून दिसून येते. आर्यन खानला दंडाला पकडून नेताना तसेच त्याच्या समवेत सेल्फी घेणारा गोसावी हा (NCB and Criminal Gosavi) एखादा अधिकारी असावा असा समज झाला होता. त्यामुळे एनसीबीने सोमवारी तो खासगी व्यक्ती असून त्याचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

NCB and Criminal Gosavi. It is now clear that Gosavi is a notorious criminal. He has been charged with three fraud cases and taking lakhs of rupees. He has been arrested in some cases. In one, he is still wanted criminal :

त्यानंतर बुधवारी राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी त्याचा व भाजपचा पदाधिकारी मनीष भानुशाली यांचा एनसीबीच्या कारवाईतील सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर दोघांचे खरे रूप सर्वांसमोर आले. या दोघांसह १० जण साक्षीदार असल्याचे जाहीर केले. मात्र गोसावी हा सराईत गुन्हेगार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्याच्यावर फसवणूक करून लाखो रुपये घेणे, धमकी देण्यासारखे ३ गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यांमध्ये त्याला अटक झाली आहे. तर एकामध्ये तो अद्यापही फरार असल्याचे रेकॉर्डवर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यात राहात असलेल्या गोसावीविरुद्ध पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात २९ मे २०१८ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्याने फेसबुकवरून मलेशियात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील तरुणाची तीन लाखाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्याला फरार घोषित करण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी सांगितले. गोसावीवर ठाण्यातील कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये २०१५ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. नोकरीचे आमिष दाखवून फसवल्या प्रकरणी अटक झाली असून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. अन्य एक गुन्हा मुंबईच्या अंधेरी पोलीस ठाण्यात दाखल आहे. ३ जानेवारी २००७ रोजी व्यंकटेशम शिवा वायरवेलने विनोद मकवाना याच्या समवेत क्रेडिट कार्डची डिलिव्हरी न देता त्यांच्या क्रेडिट कार्डने १७,५०० रुपयांची शॉपिंग केली. या प्रकरणात दोघांनीही मे २००७ मध्येच पोलिसांनी अटक झाली होती. न्यायालयात मात्र सबळ पुराव्याच्या अभावी त्याच्यासह इतरांची सुटका झाली आहे.

गळ्यात सोन्याची मोठी साखळी, सोबत खासगी सुरक्षारक्षक घेऊन फिरणारा किरण गोसावी हा खासगी डिटेक्टिव्ह असल्याचे सांगतो. त्याच्या कारवर पोलिसाची प्लेट लावलेली असते. त्यामुळे क्रूझवरील एक पोलीस अधिकारी सापडला असल्याची चर्चा रंगली होती.

हे सुद्धा वाचा – Kalyan Jewellers Share Price | कल्याण ज्वेलर्सच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांची उसळी | गुंतवणूकदारांची लॉटरी

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: NCB and Criminal Gosavi exposed after cruise rave party raided.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x