11 May 2024 12:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | हलक्यात घेऊ नका! Infosys, TCS, Wipro सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम HAL Share Vs BEL Share Price | PSU HAL आणि BEL शेअर्स दणादण परतावा देणार, अल्पावधीत 30% कमाई करा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 140% परतावा, गुंतवा पैसे Amazon Sale | सॅमसंग, रियलमी आणि रेडमी 5G स्मार्टफोन 12,000 रुपयांनी स्वस्त, ऑफरवर तुटून पडले ग्राहक Smart Investment | पगारदारांनो! बचत रु.100, जमा होतील 10 लाख 80 हजार रुपये, परतावा मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये Post Office Scheme | या आहेत पोस्ट ऑफिसच्या 4 सुपरहिट योजना, जबरदस्त कमाईसह मिळेल मोठा परतावा
x

राहुल गांधींच्या चेहऱ्यावर दिसला लेझर लाइट; काँग्रेसला स्नायपर हल्ल्याची भीती

Congress, Rahul Gandhi

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. काँग्रेसनं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना एक लेखी पत्र लिहिलं आहे. अहमद पटेल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश यांनी मिळून हे पत्र लिहिलं आहे. राहुल गांधी अमेठीत पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांच्या चेहऱ्यावर कोणी तरी तब्बल ७ वेळा हिरव्या कलरची लेझर लाइट मारली. स्नायपर हल्ल्यात अशी लेझर लाइट वापरली जात असल्याची शक्यताही काँग्रेसनं व्यक्त केली आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या जीविताला धोका असून, त्यांची सुरक्षा वाढवण्याची गरज असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.

काँग्रेसनं केंद्रीय गृहमंत्रालयाच्या लिहिलेल्या या पत्राबरोबर पेन ड्राइव्हमध्ये तो हिरव्या लेझर लाइटचा व्हिडीओही पाठवला आहे. काँग्रेसच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधींचाही या पत्रात उल्लेख आहे. काँग्रेसनं हा व्हिडीओ जारी केला असून, त्यात १५ सेकंदांपर्यंत चेहऱ्यावर लेझर लाइट मारलेली दिसत आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी राफेल करारासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया देत आहेत.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x