26 September 2020 9:13 PM
अँप डाउनलोड

तथ्यहीन आरोप? राहुल गांधी किंगफिशरचे मालक मग बँकांची आणि ईडी'ची कारवाई मल्ल्यावर का?

नवी दिल्ली : किंगफिशर कंपनीचा मालक विजय मल्ल्याने भारत सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटलींना भेटल्याचा आणि बँकेच्या कर्जप्रकरणी अरुण जेटलींकडे सेटलमेंटचा प्रस्ताव मांडल्याचा खुलासा केला. त्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आक्रमक झाले आणि त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. अर्थमंत्र्यां अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यानंतर केवळ राजकीय संकटात सापडलेल्या भाजपने पुन्हा तडफदार प्रवक्ते संबित पात्रा यांच्यावर राहुल गांधींना उत्तर देण्याची नैसर्गिक जवाबदारी सोपवली. त्यानुसार त्यांनी अपेक्षेनुसार बेछूट आणि तथ्यहीन आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचावर केले आहेत. त्यांनी थेट पत्रकार परिषद घेत गांधी कुटुंबाचे मल्ल्याच्या किंगफिशरसोबत आर्थिक संबंध असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. राहुल गांधी किंगफिशरचे मालक असल्याचा दावा सुद्धा भाजपने यावेळी केला आहे.

परंतु त्यांनी केलेल्या आरोपानंतर दुसरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि ते म्हणजे जर राहुल गांधी किंगफिशर एअरलाईन्सचे मालक असतील तर बँकांनी आणि ईडी’ने चौकशीचा फार्स राहुल गांधींऐवजी विजय मल्ल्याच्या भोवती का आवळला आहे? तसेच लंडनमध्ये स्वतः फरार असलेल्या विजय मल्ल्याने ऑन रेकॉर्ड अर्थमंत्री अरुण जेटलींच्या संदर्भात विधान करताच भाजपला हे सत्य कस काय आठवलं? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. किंगफिशर कंपनीच्या मालकीबाबत जे भाजप बोलत आहे त्यानुसार कंपनीच्या मालकांच्या यादीत सुभाष गुप्ते, आयनी नेडुंगडी, विजय मल्ल्या, मनमोहन सिंग कपूर या संचालकांची आणि श्रीनिवासलू मागुंटा (अतिरिक्त) अशी मालकांची नाव आहेत. मग भाजपच्या आरोपांमध्ये मध्ये किती तथ्य आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Congress(402)BJP(421)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x