12 December 2024 7:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

प. बंगालच्या प्रचारात Map'वर तोंड बंद, App'वर 'डिजिटल स्ट्राईक'ची भाषणं

Chinese Apps, West Bengal, BJP Rally, Digital Strike

नवी दिल्ली, २ जुलै : भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, टिकटॉकच्या एकूण जागतिक व्यवसायापैकी ३० टक्के व्यवसाय भारतात होत असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे बंदी कायम राहिल्यास टिकटॉकला मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. त्या पार्श्वभूमीवर टिकटॉकच्या व्यवस्थापनाने केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच त्यासाठी देशातील मोठ्या कायदेतज्ज्ञांना न्यायालयात उतरवण्याची तयारी कंपनीने केली आहे.

दुसरीकडे भाजपने पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केलं आहे. विशेष म्हणजे २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्जिकल स्ट्राईक आणि पाकिस्तानच्या विरोधातील भावनिक मुद्याचा पूर्ण उपयोग प्रचारात केला होता. मात्र सध्या देशभरात चीनविरुद्ध वातावरण असल्याने आणि लडाखच्या Map’वर शांत राहणारे भाजपचे नेते App’चा मुद्दा भावनिक वातावरण करून त्याला “डिजिटल स्ट्राईक” असं नामकरण करून पश्चिम बंगालमध्ये व्हर्चुअल प्रचारात कामाला लागले आहेत. स्वतः केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री “डिजिटल स्ट्राईक” शब्दाचा प्रयोग व्हर्चुअल प्रचारात करताना दिसत आहेत.

मात्र अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या ५९ चिनी अँपवर भारतात बंदी घालण्यात आली आहे, त्यांना गुगलने अजून कायम स्वरूपी प्ले-स्टोअरवर डिलीट केलेलं नाही. तसेच संबंधित apps प्ले-स्टोअर तात्पुरत्या स्वरूपात ब्लॉक केले आहेत अशी माहिती पीटीआयने दिली आहे.

 

News English Summary: We banned Chinese apps to protect data of countrymen it was a digital strike Ravi Shankar Prasad tells Bengal BJP rally

News English Title: BJP using Chinese apps issue for West Bengal BJP Rally News Latest updates.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x