4 May 2024 9:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

लडाखमधील वादाला चीन जवाबदार..अमेरिकेची प्रतिक्रिया

India China, Ladakh, Galvan Valley in eastern Ladakh, White House

वॉशिंग्टन, २ जुलै : पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला होता. आता अमेरिकेनेही भारताला पाठिंबा दिला असून व्हाइट हाऊसने या मुद्द्यावरून कठोर प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. शिवाय, सध्या सीमेवर निर्माण झालेल्या तणावाला चीनलाच जबाबदर धरण्यात आलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी या मुद्द्यावर म्हटलं आहे की, “भारत-चीन सीमेवर चीनची आक्रमक भूमिका ही जगातील अन्य भागातील चीनच्या आक्रमकतेच्या पॅटर्नशी सुसंगत आहे. अशा कृतीमधून चिनी कम्युनिस्ट पार्टीचा खरा स्वभाव दिसून येतो.” भारत-चीन सीमावादाच्या विषयावर व्हाइट हाऊसची आतापर्यंत थोडी सौम्य भूमिका होती. पण प्रथमच इतक्या कठोर शब्दात चीनला फटकारल्याचे वॉशिंग्टनमधील भारत-अमेरिका संबंधांच्या अभ्यासकांनी सांगितले.

१५ जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर पूर्व लडाखमधल्या परिस्थितीवर अमेरिकेचे अत्यंत बारीक लक्ष आहे. “भारत आणि चीन दोघांनी तणाव कमी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्याच्या परिस्थितीत शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याला आमचा पाठिंबा आहे” असे व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिवाने म्हटले आहे.

भारतानं राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदीला अमेरिकेनंही समर्थन दिलं आहे. या बंदीमुळे भारताचं सार्वभौमत्व आणि सुरक्षेला चालना मिळणार असल्याचं मत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी व्यक्त केलं. “चीनमधील कम्युनिस्ट पक्षासाठी सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या या अ‍ॅपवर भारतानं घातलेल्या बंदीचं आम्ही स्वागत करतो. भारताच्या दृष्टीकोनातून या निर्णामुळे सार्वभौमत्वाचं रक्षण होईल,” असं त्यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान म्हटलं.

 

News English Summary: India was backed by several countries after the violence in the Galvan Valley in eastern Ladakh. Now the US has backed India and the White House has reacted strongly to the issue.

News English Title: India was backed by White House after the violence in the Galvan Valley in eastern Ladakh News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x