4 December 2024 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: VEDL Investment Tips | असा वाढेल पैशाने पैसा, तुमच्याकडील पैसे पुन्हा होतील डबल; या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा - Marathi News Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IPO GMP | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केट'मध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल - GMP IPO 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगा'बाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्का Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SUZLON Horoscope Today | काहींचा सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढेल तर काहींना मिळेल यशाची गुरुकिल्ली, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य
x

एकाबाजूला चीनच्या भारतासोबत बैठका, दुसरीकडे सीमेवर २० हजार जवान तैनात केले

Ladakh, PLA, India China

लडाख, १ जुलै : कालच चुशुलमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य अधिकाऱ्यांमध्ये पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली. त्यासाठी दोन्ही बाजूने सैन्य कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असं वृत्त पीटीआयने लष्करातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले होते.

पण प्रत्यक्षात नियंत्रण रेषेवर असे होताना दिसत नाहीय. उलट चीनकडून सैन्याची तैनाती वाढवली जात आहे. तिबेट भागामध्ये चीनच्या दोन डिविजन नेहमीच तैनात असतात. यावेळी भारताचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी दोन हजार किलोमीटर अंतरावरुन मेनलँड चायनामधून अतिरिक्त दोन डिविजन मागवल्या आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.

गलवान खोरे, पेट्रोलिंग पॉइंट-15, पेंगाँग त्सो आणि फिंगर एरियामध्ये भारताने तैनाती वाढवली आहे. चीनचा सामना करण्यासाठी भारताने एक ब्रिगेड एवढे सैन्य तैनात केले आहे. याशिवाय भारताने रणनीतीक पॉइंट्सवरही आपली तैनाती अधिक वाढवली आहे. तसेच टँक आणि शस्त्रास्त्रे सीमेवर पोहोचविली जात आहेत.

सरकारच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने सीमेवर 20 हजार जवान तैनात केले आहेत. याच बरोबर चीनने उत्तर शिनझियांग प्रांतातील आपल्या अतिरिक्त डिव्हिजनलाही एलएसीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. चिनी सैन्याचे अतिरिक्त डिव्हिजन 48 तासांत भारतीय पोझिशनवर पोहोचू शकते.

 

News English Summary: China has deployed 20,000 troops on the border. At the same time, China has decided to bring its additional division in the northern Xinjiang province to the LAC. An additional division of the Chinese army could reach the Indian position in 48 hours.

News English Title: Ladakh PLA Has Deployed Over 20000 Troops Along Lac News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x